गुहागर : कोरोनाच्या काळात महाराष्ट्र राज्यात ठाकरे सरकारने मंदिरे बंद केली होती. अजूनही मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात न आल्याने झोपलेल्या ठाकरे सरकारला जाग्यावर आणण्यासाठी भाजपाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. गुहागर तालुक्यातसुद्धा भाजपाच्या वतीने मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
The Thackeray government had closed temples in the state of Maharashtra during the Corona period. As temples have not yet been opened for darshan, a state-wide agitation was launched by the BJP to bring the sleeping Thackeray government On the spot.
भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली गुहागर तालुक्यात ठिकठिकाणी मंदिराबाहेर शंखनाद, घंटानाद करून मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. कोरोनामुळे महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. कालांतराने हॉटेल, बार, दुकाने अन्य व्यवसाय अटी शर्ती लागू करून सुरू करण्यात आले. परंतु मंदिरे खुली करण्यासाठी कोणतीही नियमावली जाहिर करण्यात आलेली नाही. सरकारमध्ये असलेले मंत्री, आमदार त्यांची मुले खुलेआमपणे मंदिरांमध्ये जाऊन अभिषेक करत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यांच्यासाठी मंदिरे खुली केली जातात. मग सर्वसामान्यांना मंदिरात प्रवेश का दिला जात नाही, असा सवाल भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्यात लवकरात लवकर मंदिरे खुली करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे.
गुहागर तालुक्यात भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, तालुका चिटणीस साईनाथ कळझुणकर, श्रीकांत महाजन, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष श्रद्धा घाडे, गटनेते उमेश भोसले, युवा मोर्चा शहराध्यक्ष मंदार पालशेतकर आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.