• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजप नेत्यांनी उचलला आहे

by Ganesh Dhanawade
June 25, 2021
in Old News
17 0
0
आ. जाधव उद्या नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेणार
34
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आ. भास्कर जाधव यांचा घणाघात

खेड : राज्यातील नेत्यांना सातत्याने त्रास देण्याचे काम भाजप करत आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी उचलला आहे. असा घणाघात शिवसेना प्रवक्ते तथा आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. ते आज (शुक्रवार) खेडमधील कोरेगाव येथे कोविड सेंटरच्या उद्घाटनाला आले असताना बोलत होते.
2019 मध्ये भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले, तेव्हापासून भाजपचा सुडाच्या राजकारणाचा प्रवास सुरू झाला आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीची कृती, ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला संपवण्याचीच आहे, आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे महाराष्ट्रातील भाजपचे नेते आहेत. अनिल देशमुख असतील, अनिल परब असतील, किंवा भाजपच्या कार्यकारिणी मिटिंगमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ईडीने चौकशी करावी अशा पद्धतीचा ठराव होतो. भुजबळ साहेबांनी नुसते मत प्रदर्शित केले तर त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगतात तुम्ही जामिनावर सुटलेला आहात, जपून बोला याचा अर्थ केंद्रातील सत्तेचा दुरूपयोग हा मराठी माणसाला संपवण्यासाठी भाजप करत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. याचाच परिपाक म्हणजे या रेड आहेत. राज्यातील नेत्यांना सातत्याने त्रास देण्याचे काम भाजप करत आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी उचलला आहे, आणि त्याचाच परिपाक म्हणजेच अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्या घरावर सातत्याने होणाऱ्या रेड आहेत. असे ते म्हणाले. याचा मी जाहीर निषेध करत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र बाकी सगळे इंद्र, आणि तोच प्रकार आज देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत सातत्याने घडतोय, त्यांनी फक्त टीका करावी, आरोप करावेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि संस्काराला काळिमा फासण्याचे काम करावे एवढेच त्यांचे काम सुरू आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsMLA Bhaskar JadhavNews in Guhagarआमदार भास्कर जाधवउपमुख्यमंत्री अजित पवारगुहागर तालुका शिवसेनाटॉप न्युजताज्या बातम्याभाजपभाजपाभारतीय जनता पार्टीमराठी बातम्यालोकल न्युजशिवसेना
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.