• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुका भाजपतर्फे पूरग्रस्त भागात 3500 फुडपॅकचे वितरण

by Ganesh Dhanawade
August 7, 2021
in Old News
16 0
0
गुहागर तालुका भाजपतर्फे पूरग्रस्त भागात 3500 फुडपॅकचे वितरण
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : माजी आमदार, लोकनेते कै. डॉ. तात्यासाहेब नातू यांच्या स्मृतिदिनानिमित्त “अन्न सेवा सप्ताहाचा” संकल्प चिपळूण परिसरातील पुराची भयावह परिस्थिती प्रत्यक्ष पाहिल्यानंतर इतर मदती बरोबरच या पूरग्रस्तांना तयार जेवण देणे हे प्राधान्यक्रमाचे काम होते. हे लक्षात घेऊन गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने अन्नसेवा सप्ताहाचे आयोजन करून प्रतिदिनी पाचशे फूड पॅक (पोळी भाजी, पुरी भाजी, डाळखिचडी ) अशाप्रकारे सात दिवसात 3500 फुडपॅक चिपळूण शहर व परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन देण्यात आले.
Guhagar Taluka Bharatiya Janata Party organized Food Service Week and distributed 3500 food packs (poli bhaji, puri bhaji, dalkhichdi) daily to the flood affected people of Chiplun city and its environs in seven days.
यामध्ये पेठमाप, खेंड, बुरटे आळी मजरेकाशी, वालोपे, कळंबस्ते, कावळीतळी राहुल गार्डन, वडार कॉलिनी, दळवटणे गणेश वाडी, भुवडवाडी, नलावडेवाडी अशा परिसरात व चिपळूणमधे मदतकार्यासाठी विविध स्तरातून आलेले सेवेकरी यांना गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष जाऊन या फुडपॅकचे वाटप केले. गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने अन्न सेवा सप्ताहाचे आयोजन केल्यानंतर या स्तुत्य उपक्रमासाठी ऋषिकेश गोखले, प्रियांका सुर्वे, संगीता सुर्वे, मनीषा सुर्वे, जाई सुर्वे, प्राजक्ता सुर्वे, स्वप्नील अडूरकर, कोतळूक उदमेवाडी ग्रामस्थ, उदय शिलधनकर, गणेश भिडे, तुषार सुर्वे, सुविधा नागवेकर, रितिका शेलार, मृणाली मयेकर, दिलेश नार्वेकर, तृषांत सुर्वे, प्रियांका शिवणकर, माधव साठे, प्रवीण बारस्कर, श्रुती राणे, दिपराज कदम, नीता यादव, प्राची बारगोडे, हर्षद सुर्वे, श्रीकांत महाजन, शशिकांत महाजन, प्रकाश जोशी, अभिजीत लिंगायत, संजय भोळे, रवींद्र मुके,दत्तात्रय आरेकर, उदय जोशी, श्रीकांत शेवडे, नवीन महाजन, राहुल कोकजे, अनिल महाजन, ज्योती जोशी, श्याम गडदे, विजय गावणंग, मंगेश गडदे, विनायक सुर्वे, विजय भुवड, प्रमोद सुर्वे,विनायक लांजेकर, दर्शन नागवेकर,गोपाळ झगडे, अॉल्वीन पुजारी, हर्षद गोरीवले, राजदत्त बागकर, प्रथमेश पाडेकर, महालक्ष्मी महीला मंडळ पालशेत, उदय दणदणे, एसपी ग्रुप गिमवी, वडद, परचुरी भाजप कमिटी, वैशाली जोगळेकर/देव, अजय घैसास, काटदरे सर, मंजिरी ओक, वेळंब ग्रामस्थ, किरण वैद्य, दिनेश बागकर, संतोष जैतापकर, दिपक मोरे, मंगेश रांगळे, महेश तोडणकर, श्रीकांत मोरे, शार्दुल भावे, किरण गडदे, दिनेश सुर्वे, महेश भाटकर, संतोष सुर्वे, दुर्वांकुर सुर्वे, अमोल पोवळे, चिंद्रावळे म्हावळुंगे वाडी ग्रामस्थ आदींनी बहुमोल सहकार्य केले. या अन्नसेवा सप्ताहात फुडपॅक वितरणाच्यावेळी माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष मालप, शहराध्यक्ष आशिष खातु, महेश ठाकरे, एस.पी.महाडीक, संदिप सुखदरे यानी विशेष सहकार्य केले. अन्न सेवा सप्ताहात स्वयंप्रेरणेने सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने अध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, विजय भुवड यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Tags: distributefloodfood packsFood Service WeekGuhagarGuhagar NewsGuhagar Taluka Bharatiya Janata PartyMarathi NewsNews in Guhagarअन्न सेवा सप्ताहगुहागर तालुका भाजपगुहागर तालुका भारतीय जनता पार्टीटॉप न्युजताज्या बातम्यापूरग्रस्तफुडपॅकभाजपभाजपामराठी बातम्यालोकनेते कै. डॉ. तात्यासाहेब नातूलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.