गुहागर : हेदवी हेदवतड – नवलाई मंदिर – उमराठ धारवाडी ते वाडदई खालचीवाडी रस्त्याचे भूमिपूजन आ. भास्करराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सदरचा रस्ता ९ कि. चा असून रू. २ कोटी ७० लाख रुपये मंजूर झाले आहेत. Bhumipujan of Hedavi Hedavatad – Navlai Temple – Umrath Dharwadi to Waddai Khalchiwadi Road was done by MLA Bhaskarrao Jadhav. This road is 9 km. Rs. 2 crore 70 lakhs have been sanctioned for this Road. (Bhumipujan of Road)
यावेळी वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. नेत्रा ठाकूर, सभापती सौ. पूर्वी निमुणकर, शिवसेना उपप्रमुख श्री. विलास वाघे, पंचायत समिती सदस्या सौ. पुनम पास्टे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता श्रीमती निकम, माजी सभापती दत्ताराम निकम, हेदवी ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन हेदवकर, वेळणेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच चैतन्य धोपावकर, ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर, वेळणेश्वरचे तंटामुक्ती अध्यक्ष विनायक कांबळे, आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
सदरचा रस्ता ९ कि. चा असून गेले अनेक दिवस या रस्त्याचे सुधारणा करून खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम प्रलंबित होते. या रस्त्यासाठी रू. २ कोटी ७० लाख रुपये मंजूर झाले आहेत. काही त्रांतिक अडचणीमुळे सदर रस्ता प्रलंबित होता. मध्यंतरी कोरोना प्रादुर्भावामुळे कामे सुद्धा ठप्प झालेली होती. सदर रस्ता हेदवी हेदवतड, उमराठ आणि वाडदई खालचीवाडी या तीन गावातून जरी जात असला तरी ९ कि. मी. पैकी जवळपास ६ ते ते ७ कि. मी. चे अंतर फक्त उमराठ गावातील आहे. सदर रस्त्याच्या कामासाठी उमराठ ग्रामविकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा सुरूच ठेवला होता परंतु प्रत्यक्षात यश येत नव्हते. त्यानंतर फेब्रु. २०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत श्री. जनार्दन आंबेकर सरपंच पदी बिनविरोध निवडून आल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आ. भास्करराव जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला. त्याला यश येऊन आ. जाधव रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शशिकांत पवार होते. यावेळी उमराठ आणि उमराठ खुर्द या दोन्ही गावातील संदिप गोरिवले, गंगाराम घाडे, कुंदन कदम, वसंत कदम, भिकू मालप, प्रकाश पवार, उदय पवार, सुरेश पवार, सुभाष पवार, नामदेव पवार, गणपत गावणंग, शशिकांत गावणंग, कृष्णा गोरिवले, कृष्णा गावणंग, अशोक जालगावकर, शांताराम गोरिवले, सदानंद घाडे, गोविंद धनावडे, दत्ता आंबेकर, संदीप आंबेकर आदी उपस्थित होते.