गुहागर : मालगुंड एज्युकेशन सोसायटी मालगुंड (ता.जि.रत्नागिरी) संचलित माध्यमिक विद्यालय काजुर्ली(ता.गुहागर) या प्रशालेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ चेअरमन सुनील मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली व ऋषिकेश मयेकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
संस्थेचे माजी चेअरमन नाना मयेकर यांच्या ६० व्या जयंती दिनाचे औचित्य साधून नुतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. चेअरमन नानासाहेब मयेकर यांच्या आकस्मिक निधनामुळे संस्था व मयेकर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला होता.काजुर्ली विद्यालयाची सुसज्ज इमारत व्हावी अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार मयेकर कुटुंबीयांच्या वतीने डॉ.नानासाहेब मयेकर यांच्या नावाने काजुर्ली विद्यालयाची नूतन इमारत बांधण्यात येणार आहे.भूमिपूजन समारंभात शाळा विकासात योगदान देणाऱ्या ग्रामस्थांचा संस्थेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. यावेळी माजी शिक्षण सभापती ह.भ.प.शरद बोरकर, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे, सेक्रेटरी विनायक राऊत, खजिनदार संदीप कदम, संचालक किशोर पाटील,विवेक परकर, शंकर आंबेकर,गजानन पाटील,माधव घनवटकर, दिप्ती मयेकर, रोहित मयेकर, श्रीकांत मेहेंदळे, नंदकुमार साळवी यांसह संस्थेचे सर्व पदाधिकारी, मयेकर कुटुंबीय-मित्रपरिवार, जाकादेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक बिपीन परकर, मालगुंड विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत कदम, चाफे महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा पालये,काजुर्लीचे माजी सरपंच डॉ.आनंद जोशी,अनंत मोहिते, अशोक जयसिंग मोहिते, अर्जुन देसाई, कैलास साळवी, चंद्रकांत खानविलकर, सुधाकर गोणबरे, भालचंद्र जोशी, सीमा लिंगायत, नारायण मोहिते यांसह गावातील ग्रामस्थ, पालक,आजी- माजी विद्यार्थी उपस्थित होते.नाना मयेकर यांचा शैक्षणिक वारसा अव्याहतपणे पुढे चालवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत शरद बोरकर यांनी व्यक्त केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक अमोल पवार तर आभार प्रदर्शन आशिष घाग यांनी केले. मालगुंड एज्युकेशन सोसायटी, मयेकर कुटुंबीय, स्थानिक शाळा समिती व माध्यमिक विद्यालय काजुर्ली यांच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.