गुहागर : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव हे दि. २० व २२ ऑक्टोबर रोजी गुहागर दौ-यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते अंजनवेल जिल्हा परिषद गटातील 11 गावांमध्ये 23 विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. Ratnagiri Zilla Parishad President Vikrant Bhaskar Jadhav is coming in Guhagar at 20th and 22nd October. In this Tour, Bhumi Pujan of development works in 11 villages of Anjanvel Zilla Parishad group will be done by him.


जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.
बुधवार, दि. २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११.३० वा. वडद येथे विकास कामांचे भुमिपूजन व बैठक,
बुधवार, दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १.३० वा. पेवे येथे विकास कामांचे भुमिपूजन व बैठक,
बुधवार, दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते ३ वा. निगुंडळ येथे विकास कामांचे भूमिपूजन व जेवणासाठी राखीव,
बुधवार, दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वा. प्रा. आ. चिखली येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण,
बुधवार, दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३.१५ ते ४.३० वा. पालपेणे येथे विकास कामांचे भूमिपूजन व बैठक,
बुधवार, दि. २० ऑक्टोबर रोजी सायं. ४.४५ ते ६ वा. खामशेत विकास कामांचे भूमिपूजन.
शुक्रवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ वा. साखरी त्रिशुळ येथे विकास कामांचे भुमिपूजन व बैठक,
शुक्रवार दि. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ११.३० ते १.३० वा. पवार साखरी येथे विकास कामांचे भुमिपूजन व बैठक,
शुक्रवार दि. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० ते ३ वा. धोपावे येथे विकास कामांचे भुमिपूजन व बैठक,
शुक्रवार दि. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ४ वा. जेवणासाठी राखीव,
शुक्रवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सायं. ४.३० ते ५.३० आरे येथे विकास कामांचे भुमिपूजन व बैठक,
शुक्रवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सायं. ६ ते ७ वरवेली येथे विकास कामांचे भूमिपूजन व बैठक.


या दौऱ्यात 1 कोटी 27 लाख 97 हजार रुपयांच्या 23 कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यामध्ये खालील कामांचा समावेश आहे.
साखरी बुद्रुक खामकर वाडी व मुळगाववाडी नळ पाणी पुरवठा दुरस्ती. (रु. 4 लाख )
खामशेत गोठणीचा पऱ्या ते शिगवणवाडी पाईप लाईन दुरुस्ती. (रु. 3 लाख)
खामशेत कुंभारवाडी गोठणनीचा पऱ्या येथे साकव बांधणे. (रु. 10 लाख)
वरवेली रांजाणेवाडी साठवण टाकी बांधणे. (रु. 6 लाख 99 हजार)
वरवेली आगरवाडी रस्त्य्याला बंदिस्त गटार बांधणे. (रु. 4 लाख)
वरवेली गावडे अवेरेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. (रु. 5 लाख)
पालपेणे येथे साठवण टाकी बांधणे. (रु. 8 लाख 98 हजार)
पालपेणे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे. (रु. 3 लाख)
पालपेणे कुंभारवाडी ते स्मशानभुमी रस्त्यावर साकव बांधणे. (रु. 19 लाख)
पालपेणे टेपवाडी ते टाणकरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण. (रु. 5 लाख)
पालपेणे शाळा नं. २ ते मराठवाडी चिंचवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. (रु. 10 लाख)
धोपावे अब्दुल लतीफ मोहल्ला ते मंगेश जाधव घरापर्यंत बंदिस्त गटार बांधणे. (रु. 2 लाख)
धोपावे कुंभाराचा आंबा ते सावंतवाडी पाखाडी बांधणे. (रु. 3 लाख)
धोपावे खारवीवाडी सभागृहापर्यंत पाण्याचा निचरा होणेकरीता उपाययोजना करणे. (रु. 6 लाख)
साखरी त्रिशुळ साखरी खुर्द कुंभारवाडी नारळीची नदी येथे धोबीघाट बांधणे. (रु. 3 लाख)
साखरी त्रिशुळ गोवळवाडी येथे धोबीघाट बांधणे. (रु. 2 लाख)
आरे भंडारवाडी दशरथ भोसले घर ते राम मंदिर येथे बंदिस्त गटार बांधणे. (रु. 2 लाख)
आरे रमाकांत भोसले घर ते आरे राम मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. (रु. 5 लाख)
निगुंडळ मादाली नदी येथे धोबीघाट बांधणे. (रु. 3 लाख)
वडद ग्रामदेवता मंदिर येथे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे. (रु. 3 लाख)
पेवे मादाली नदी ते सुतारवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. (रु. 5 लाख)
पेवे डाफळेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. (रु. 5 लाख)
पेवे खरेकोंड रस्ता कि.मी. 2.00 ते 3.00 मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (रु. 10 लाख)