गुहागर : प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात अनेक अडचणी आणि संकटांचा सामना करावा लागतो.. आ. भास्करराव जाधव यांच्याही समोर ३६ वर्षांच्या राजकीय वाटचालीत कितीतरी वेळा अनंत अडचणी आल्या व संकटे उभी राहिली. परंतु, आलेल्या प्रत्येक अडचणींवर मात करून संकटांचा धीरोदात्तपणे सामना त्यांनी केला आणि म्हणूनच ते सातत्याने पुढे जात राहिले… त्याचे एक छोटेसे उदाहरण काल पहावयास मिळाले.
Everyone has to face many difficulties and crises in their life. Bhaskarrao Jadhav also faced endless difficulties and crises many times in his 36 years of political career. But, he overcame every difficulty and faced the crisis patiently and that is why he kept moving forward … A small example of this was seen yesterday.
सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या मतदारसंघातील खोपी, शिरगाव, मिर्ले या गावांमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता ते सायंकाळी चिपळूणहुन निघाले… सोबत या भागाचे जिल्हा परिषद सदस्य श्री. सुनील मोरे व अन्य काही मंडळी होती. पाऊस सुरू होता.. अतिवृष्टीने ठिकठिकाणी दरडी खाली आल्या होत्या, रस्ते खचले होते, जागोजागी चिखलमाती होती. अशा धोकादायक मार्गावरून स्वतःचा जीव धोक्यात घालून ते मिर्लेतून खोपीकडे जात असताना एका ठिकाणी एक भले मोठे झाड रस्त्याच्या मधोमध पडलेले होते.. सोबत असलेली ५-७ मंडळी गाडीतून उतरली. त्यांनी झाड बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण ते काही जाग्यावरून हलत नव्हते.. आजूबाजूचा परिसर निर्मनुष्य होता, वाहतूक तर बंदच होती, त्यामुळे मदतीला कोणी येईल याची अपेक्षाच नव्हती.. श्री. मोरे यांनी पलीकडे काही किलोमीटरवर असलेल्या खोपी गावात वेगवेगळ्या मार्गाने निरोप पाठवून कोयती-कुऱ्हाडी घेऊन येण्यास सांगितले… वेळ जात होता, सगळेच हतबल होते.. हे पाहून आ. श्री. जाधव हे गाडीतून उतरले.. हे झाड आपणही बाजूला करू शकतो, असं सांगून त्यांनी सर्वांमध्ये स्फुरण आणलं.. ‘चला, सर्वांनी उभं रहा.. देवाचं नाव घ्या आणि उचला, असं म्हणून स्वतः त्यामध्ये उभे राहिले आणि काय आश्चर्य… स्वतः साहेब झाड बाजूला करण्यासाठी उभे राहिलेले पाहून साऱ्यांच्याच बाहुत बळ संचारले आणि काही सेकंदात झाडाचा बहुतेक भाग रस्त्याच्या बाजूला गेला.. तेवढ्यात पलीकडून कोणीतरी छोटी कुऱ्हाड घेऊन आले. मग राहिलेले झाड तोडून त्यांनीच रस्ता मोकळा केला आणि ते पुढे खोपी, शिरगाव या गावांमध्ये पोहोचले..
सांगायचा मुद्दा एवढाच, त्या जागी अन्य कोणी असता तर झाड बाजूला होणे शक्य नाही, असा विचार करून मागे फिरला असता, पण अडचण किंवा संकटाला घाबरून जाणारे आपण नाही, हे भास्करराव जाधव यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले.