• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
19 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी लाभापासून वंचित

by Ganesh Dhanawade
September 11, 2021
in Old News
17 0
1
संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी लाभापासून वंचित
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

न. पं. आरोग्य सभापती अमोल गोयथळे यांचे तहसीलदार यांना पत्र

गुहागर : आधीच कोरोना संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती बेताची त्यात गणेशोत्सव सण अशा वेळी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत गेली तीन महिने मिळालेली नाही. या लाभार्थ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशा मागणीचे पत्र गुहागर नगरपंचायतीचे आरोग्य आणि स्वच्छता समितीचे सभापती अमोल गोयथळे यांनी तहसीलदार प्रतिभा वराळे यांना दिले आहे.

Beneficiaries of Sanjay Gandhi Niradhar Yojana have not received any financial assistance from the government for the last three months. Amol Goyathale, Chairman, Health and Hygiene Committee, Guhagar Nagar Panchayat, has given a letter to Tehsildar Pratibha Varale demanding that these beneficiaries should get the benefit of this scheme soon.

शासनातर्फे निराधार लोकांसाठी संजय गांधी निराधार योजना ठेवण्यात आली आहे. सदरचे लाभार्थी हे आर्थिकदृष्टया दुर्बल आणि कोणताही आर्थिक आधार नसणारे असतात. गेली ३ महिने अशा लाभार्थ्यांना शासनाकडून लाभ मिळालेला नाही. गणपती सारख्या सणातही हे लाभार्थी वंचित राहिले आहेत. उर्वरित दिवसात सरदच्या लाभार्थ्यांना हा सण आनंदात साजरा करता यावा यासाठी शासनाकडून लवकरात लवकर हा लाभ त्यांना मिळावा यासाठी आपण आपल्या स्तरावर पाठपुरावा करुन त्यांना त्यांचा लाभ मिळवून दयावा, अशी विनंती गोयथळे यांनी केली आहे.

Tags: financial assistanceGovernmentGuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in GuhagarSanjay Gandhi Niradhar YojanaTehsildar Pratibha Varaleआरोग्य आणि स्वच्छता समिती सभापती अमोल गोयथळेआरोग्य सभापती अमोल गोयथळेगणेशोत्सवगुहागर नगरपंचायतटॉप न्युजतहसीलदारताज्या बातम्यामराठी बातम्यालॉकडाऊनलोकल न्युजसंजय गांधी निराधार योजना
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.