जि. प. सदस्या नेत्रा नवनीत ठाकुर यांचे आ. जाधवांना निवेदन
गुहागर : संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा विधवा व निराधार महिला लाभार्थ्यांना लाभ मिळविण्यासाठी दरवर्षी २१ हजार इतकी कुटुंबाच्या एकत्रित उत्पन्नाची कमाल मर्यादा असावी अशी शासनाची अट आहे. ही उत्पन्न मर्यादा ५० हजारापर्यंत वाढविण्यात यावी, यासाठी या चालू अधिवेशनात तारांकित प्रश्न म्हणून उपस्थित करून राज्यातील सर्व निराधार महिलांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीचे निवेदन वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या नेत्रा नवनीत ठाकुर यांनी आ. भास्करराव जाधव यांना दिले आहे.
The condition of the government is that there should be a maximum income of 21,000 families every year for the benefit of widows and destitute women beneficiaries of Sanjay Gandhi Niradhar Anudaan Yojana.This income limit should be increased to 50 thousand, For this, all the destitute women in the state should be given justice by presenting it as a starred question in the current convention. The statement of this demand was made by Netra Navneet Thakur, a member of Velneshwar Zilla Parishad group.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा विधवा व निराधार महिला लाभार्थ्यांना लाभ मिळविण्यासाठी दरवर्षी रु.२१,०००/- इतकी कुटुंबाच्या एकत्रित उत्पन्नाची कमाल मर्यादा असावी अशी शासनाची अट आहे. परंतु, घरातील कर्ता कुटुंबप्रमुख मयत झाल्यांनतर त्याच्या पश्चात आपल्या ग्रामीण भागात निराधार विधवा स्त्री असेल तर तीला शेती अथवा मोलमजुरी करूनच स्वत:चा व लहान मुले असलेल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. पती ह्यात असेपर्यंत रेशनकार्डवर नमूद केलेले उत्पन्न अधिक असते. परंतु, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्रता अटीतील प्रतिवर्षी रु.२१,०००/- इतकी कुटुंबाच्या एकत्रित उत्पन्नाची कमाल मर्यादा असल्याने याबाबत महसूल यंत्रणेकडून उत्पन्न दाखला मिळविण्यासाठी खूपच अडचणीचे होते. त्यामुळे विधवा व निराधार असूनही कित्येक महिला या अनुदान योजनेपासून वंचित राहतात.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा विधवा व निराधार महिला लाभार्थ्यांना लाभ मिळविण्यासाठी कुटुंबाच्या एकत्रित उत्पन्नाची पात्रता प्रतिवर्षी रु.२१,०००/- इतकी असलेली कमाल मर्यादा साधारणपणे रु. ५०,०००/- पर्यंत झाल्यास गरजू महिलांना याचा लाभ मिळून त्यांना भावी आयुष्य जगण्यासाठी खूपच दिलासा मिळेल. विधानसभेत केवळ कोकण वासियांचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे कित्येक प्रश्न आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण वक्तृत्व शैलीने, अभ्यासपूर्वक प्रभावीपणे मांडून जनतेला दिलासा व न्याय मिळवून देणाऱ्या आ. जाधव साहेबांनी या चालू विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न म्हणून उपस्थित करून निराधार व गरजू महिलांना न्याय मिळवून द्यावा, असे नेत्रा ठाकूर यांनी या निवेदनात म्हटले आहे.