उपमुख्यमंत्री अजित पवार, गुहागरच्या नगराध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश
गुहागर : सत्तेच्या माध्यमातून कोकणाचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. राजेश बेंडल यांनी पक्ष प्रवेश केल्यामुळे गुहागरमध्ये राष्ट्रवादी मजबूत होईल. त्यांना महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असल्याचा निश्चितपणे फायदा होईल. आता त्यांनी कोकणात राष्ट्रवादी बळकट करावी. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते राजेश बेंडल यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलत होते.
We are committed to developing Konkan through power. The entry of Rajesh Bendal into the party will strengthen the NCP in Guhagar. They will definitely benefit from the Maha Vikas Aghadi government in power.Now they should strengthen the NCP in Konkan. This statement was made by Deputy Chief Minister Ajit Pawar. He was speaking at Rajesh Bendal’s inauguration.
गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी आज राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, गुहागर नगरपंचायतीच्या मागील निवडणुकीत शहर विकास आघाडीने मोठा बदल घडवला. राजेशची गुहागर परिसरात मोठी ताकद आहे. म्हणूनच त्याने राष्ट्रवादीत प्रवेश करावा यासाठी मी आग्रही होतो. कुणबी समाजाच्या वसतिगृहासाठी अजितदादांनी 5 कोटी सरकारच्या माध्यमातून दिले आहेत. आज कोकणातील समग्र कुणबी समाज पवार साहेबांच्या, दादांच्या, जयंतरावांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कडे आकर्षित होतोय. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष राजेश बेंडल यांचा पक्षप्रवेश महत्त्वाचा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, खासदार म्हणून निवडून आल्यावर दिल्ली पासून तालुका स्तरावर सुनील तटकरे काम करत आहेत. विषेशतः कोकणातील कुणबी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी, या समाजाला पुढे नेण्यासाठी विचारपूर्वक पावले उचलत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना बळकट करण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे. अशावेळी राजेश बेंडल सारखे तरुण, सर्वांना सोबत घेऊन जाणारा, कुणबी समाजाचे नेतृत्व करणारा नेता, कार्यकर्ता राष्ट्रवादीत येतोय. मी त्यांचे स्वागत करतो. येणाऱ्या काळात चिपळूण, खेड, दापोलीतील अनेक मंडळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कोकणात राष्ट्रवादी निश्चित मजबूत होणार आहे.
आज राजेश बेडल यांच्या बरोबर पिंपर, जामसुद, वेळंब घाडेवाडी, चिंद्रावळे, दोडवली, तवसाळ, पडवे येथील शिवसेना, भाजप व काँग्रेस पक्षातील 20 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, गुहागर विधानसभा क्षेत्राध्यक्ष राजेंद्र आंब्रे, तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर, नवनियुक्त तालुका महिला अध्यक्ष व नगरसेविका सौ. स्नेहा भागडे, नगरसेविका सौ. सुजाता बागकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मंदार कचरेकर, विधानसभा उपाध्यक्ष दीपक जाधव, माजी तालुकाध्यक्ष रामचंद्र हुमणे, तुषार सुर्वे, जगदीश गडदे, जिल्हा सचिव विजय मोहिते, दीपक शिरधनकर, आसिफ साल्हे, वैभव आदवडे,संख्यातोष मोरे, प्रसाद विचारे, संतोष सोलकर, अनंत मालप, कृष्णा वणे, महादेव साटले आदी उपस्थित होते.
गुहागर नगरपंचायती मधील शहर विकास आघाडीचे नगरसेवक माधव साटले, अमोल गोयथळे, सौ. स्नेहल रेवाळे, सौ. प्रणिता साटले, आरोग्य व स्वच्छता सभापती प्रसाद बोले नगराध्यक्षा राजेश बेंडल यांच्या पक्षप्रवेशाचे वेळी उपस्थित होते.