बोलू लागल्या भिंती,स्वच्छता मोहीम घेऊ हाती
गुहागर : हागणदारी मुक्त अधिक (ओडीएफ प्लस) कार्यक्रम अधिक गतिमान करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक ठिकाणी भिंती रंगवणे स्पर्धा राबविण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने सूचित करण्यात आले होते.त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी म्हणून हागणदारीमुक्त अधिक (ओ. डी. एफ. प्लस) या संकल्पनेवर आधारित सार्वजनिक ठिकाणच्या भिंती रंगवणे स्पर्धा ही स्पर्धा केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर आयोजित केली गेली आहे. ही स्पर्धा देशातील सहा विभागात आयोजित करण्यात आली असून प्रत्येक विभागात तीन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांना गौरवण्यात येणार आहे. तसेच जास्तीत जास्त संदेश आणि भिंतीला लिहिणाऱ्या पहिल्या तीन जिल्ह्यांना राज्यस्तरावर गौरविण्यात येणार आहे.
In order to speed up the Hagandari Mukta Adhik (ODF Plus) program, it was suggested by the district administration to conduct a wall painting competition in public places at the Gram Panchayat level. Also, the first three districts with maximum message and writing on the wall will be honored at the state level.
गाव पातळीवर जनजागृती करताना हागणदारी मुक्त गाव, स्वच्छता, पाण्याचे सुयोग्य नियोजन, कचरा कुंडीचा वापर, वैयक्तिक स्वच्छता, शौचालयाचा नियमित वापर, बालकांच्या मल विष्ठेचे व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचरा व्यवस्थापन, बायोगॅस प्रकल्प, गोबर धन आदी विषयांवर सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर चित्रे, घोषवाक्य लिहून जनजागृती करण्यात येत आहे. गुहागर तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायतीने या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला असून ठिकठिकाणी लिहिलेली घोषवाक्ये आणि रेखाटलेली छायाचित्रे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत तसेच नागरिकांना या मोहिमेमध्ये स्वेच्छेने कार्यरत होण्यासाठी प्रेरीत केले जात आहे.आबलोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आरोग्य केंद्र, दवाखाने, बस स्टॉप, पोलिस चौकी, मंदिर परिसर आदी सार्वजनिक ठिकाणी चित्रे, घोषवाक्ये लिहिण्यात आली आहेत. आबलोली ग्रामपंचायतचे सरपंच तुकाराम पागडेे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक बी. बी. सूर्यवंशी, स्वच्छता समिती यांच्या पुढाकाराने गावांमध्ये हागणदारी मुक्त अधिक योजना अधिक जोमाने राबविण्यात येत आहे.