गुहागर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गुहागर : अनुसुचित जमातीचे असल्याने पूर्ववैमस्यातून गावातील धार्मिक कार्यात सहभाग घेऊ देत नसल्याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात (Guhagar Police Station)दिलेल्या तक्रारीवरून ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल (Crimes filed against 6 persons) करण्यात आला आहे. (At Pawar Sakhari, the youth was verbally abused)
गेले वर्षभराहून अधिक काळ उच्च वर्गातील लोकांकडून आपल्याला व कुटुंबाला त्रास दिला जात असल्याची तक्रारदार विजय पालशेतकर Complainant Vijay Palshetkar (रा. पवारसाखरी चिंचवाडी) Pawar Sakhari Chinchwadi यांनी दिली आहे. विजय पालशेतकर यांनी खाणीत होणाऱ्या सुरूंग स्फोटाविरोधात तक्रार दिली होती. यामुळे उत्खननाचा परवाना रद्द झाल्याने हे वाद सुरू झाले. तेव्हापासून सातत्याने आपल्याला त्रास दिला जात आहे. दमदाटी होत आहे.जातीवाचक शिवीगाळ केली जात आहे. तसेच धार्मिक कार्यापासून वंचित ठेवले जात आहे. आमच्या गायी- गुरांना मारहाण केली जात आहे. अशा स्वरूपाच्या तक्रारी त्यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिल्या आहेत. (At Pawar Sakhari, the youth was verbally abused)
पोलीस ठाण्यात (Guhagar Police Station) दाखल झालेल्या तक्रारीवरून संतोष उर्फ राजू काशिनाथ पवार, अंकुश शितप, महेश नाचरे, दीपक पवार, अनंत पवार, रवीकांत पवार (रा. पवारसाखरी गुहागर) यांच्याविरोधात गुहागर पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चा सुधारित २०१५ अधिनियम कलम ३(१) (क्यू), ३ (१) (आर) (एस) प्राण्यांशी क्रुरतेने वागण्यास प्रतिबंधक १९६० चे कलम ११ (१)(अ) भा.दं.वि.क. ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (At Pawar Sakhari, the youth was verbally abused)