वेळणेश्वर जि. प. गटाच्या सदस्या नेत्रा ठाकुर यांचा पुढाकार
गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हापरिषद गटाच्यावतीने उत्कर्ष मंडळ, गोरिवलेवाडी कोतळूक येथे जिल्हा परिषद सदस्या नेत्रा नवनीत ठाकुर यांच्या पुढाकाराने आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व आशासेविका व आरोग्य कर्मचारी यांचा कोवीड योध्दा म्हणून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
Utkarsh Mandal on behalf of Velneshwar Zilla Parishad Group in the taluka, at Gorivalewadi Kotluk on the initiative of Zilla Parishad Member Netra Navneet Thakur all the hopefuls and health workers of Abloli Primary Health Center were felicitated as Covid Yodha.
वेळणेश्वर गटाच्या जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर यांनी कोरोना काळात आपल्या गटात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून येथील सर्वसामान्यांना मोठा आधार दिला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्या जीवाची पर्वा न करता गटातील नागरिकांच्या आरोग्यासाठी धावपळ करत होत्या. शासनाच्या मदतीची वाट पाहत न बसता गटातील कार्यकर्त्यांच्या सहकार्याने कोरोना बाधित व संशयित रुग्णांना उपचारासाठी खाजगी वाहनाने रुग्णालयापर्यंत पोहवविण्याचे काम केले. त्यामुळे त्यांना जनाधारही मोठा लाभला आहे.
आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रांतंर्गत आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांनी कोवीड आपत्तीत घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी, लसीकरण केले. त्यांचे हे योगदान मोलाचे असल्याने त्यांचा सन्मान करावा, अशी इच्छा मनी बाळगून गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य सौ. नेत्रा ठाकूर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पूर्वी निमूणकर, उपसभापती सीताराम ठोंबरे, माजी सभापती सौ. पूनम पाष्टे, विलास वाघे, आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. अतुल गावड, शीर सरपंच विजय धोपट, शैलेश साळवी, पिंपर सरपंच पूर्वी मोरे, कोतळूक सरपंच उर्मिला गोरिवले, शिवसेना विभागप्रमुख अंकुश शिगवण, अमित साळवी, संदेश भाटकर, सर्व आशासेविका, आरोग्यसेवक आदी उपस्थित होते.