• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुणवत्ता शोध परीक्षेत आर्या गोयथळे केंद्रस्तर यादीत प्रथम

by Ganesh Dhanawade
January 15, 2021
in Old News
17 0
0
गुणवत्ता शोध परीक्षेत आर्या गोयथळे केंद्रस्तर यादीत प्रथम
34
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : सांगली शिक्षण संस्था आयोजित गुणवत्ता शोध परीक्षेत श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालयाची कु. आर्या मंदार गोयथळे हिने २५४ गुण मिळवून केंद्र स्तर गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.                                   
फेब्रुवारी २०१९ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र कोरोना महामारीमुळे या परीक्षेचा निकाल लांबणीवर पडला होता. गुहागर केंद्रातून एक हजार विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते. यामध्ये इयत्ता चौथी मधील केंद्रस्तरावर प्रथम आर्या मंदार गोयथळे, द्वितीय रेईशा चौगुले, तृतीय सानवी गोयथळे, चतुर्थ रुद्र जोगळेकर यांनी क्रमांक मिळविले. तर इयत्ता तिसरी मध्ये केंद्रस्तर गुणवत्ता यादीत स्वरा पाटील प्रथम व द्वितीय क्रमांक शंतनू मोरे याने प्राप्त केला. इयत्ता २री मधून केंद्रस्तर गुणवत्ता यादीत साईराज शिंदे प्रथम आला.                                    
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गुहागर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेश भोसले, शालेय समिती अध्यक्ष स्नेहा परचुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईनाथ कळझुणकर,  मुख्याध्यापक समीर गुरव, संजय गमरे, सुरेखा शिंदे, प्रणाली बेंडल व सर्व संचालक वर्गांनी अभिनंदन केले.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarकोरोनागुणवत्ता शोध परीक्षागुहागर एज्युकेशन सोसायटीटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजशाळा व्यवस्थापन समितीश्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालयसांगली शिक्षण संस्था
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.