• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळी बाजारपेठेत वाहतूक व्यवस्था सुरळीत

by Ganesh Dhanawade
September 5, 2022
in Guhagar
17 0
0
Appreciable performance by police
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

गुहागर ता. 05 : गणेशोत्सवा दरम्यान गुहागर तालुक्यातील सतत वर्दळीची असलेली शृंगारतळी बाजारपेठमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत असून पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शृंगारतळी या मंडळाने देखील त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. Appreciable performance by police

मागील दोन वर्षे कोरोना संकटामुळे चाकरमनी यावर्षी आपल्या गावी गणेशोत्सवासाठी हजारोंच्या संख्येने आलेले आहेत. बहुसंख्य चाकरमनी गावी येताना आपली वाहने घेऊन आले आहेत. शृंगारतळी ही तालुक्याची मुख्य बाजारपेठ असल्याने सर्व ग्राहक खरेदीसाठी येत असतात. लाखो रुपयांची उलाढाल याठिकाणी होत असते. गणपती काळात देखील हजारो ग्राहक वाहने घेऊन याठिकाणी खरेदीसाठी येत आहेत. बाजारपेठ मधील रस्त्यावर वाहने लावण्यास जागाच शिल्लक नसल्याचे दिसत आहे. जागेची अडचण असताना देखील येथील वाहतूक पोलिसांनी नम्रपणे नागरिकांशी संवाद साधत सहकार्य करण्याची विनंती करत आहेत. स्थानिक व मुंबईकर नागरिक पोलिसांच्या विनंतीला मान देत आहेत. Appreciable performance by police

सध्या सायंकाळी बाजारपेठेत गर्दी होत असते. त्याचप्रमाणे मुंबईला जाणाऱ्या वाहनांची सुद्धा गर्दी होत असते. परंतु येथील पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे सर्व वाहने सुरळीतपणे मार्गस्थ होत आहेत. बाजारपेठेतील शृंगारतळीचा राजा पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. याही भाविकांच्या गर्दीला नियंत्रण करण्याचे काम पोलिसांना करावे लागत आहे. कोणताही अनुचित प्रकार बाजारपेठेत घडलेला नाही. Appreciable performance by police

गुहागर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. पाटील, सहा. पो. उपनिरीक्षक प्रमोद मोहिते, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. शिवलकर, पो.कॉन्स्टेबल उदय मोनये, होमगार्ड सूरज सावंत, प्रवीण काजारे, संकेत शितप आदी कर्मचारी दिवस रात्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत आहेत. Appreciable performance by police

Tags: Appreciable performance by policeGuhagarLatest Marathi NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.