भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांचे कृषिमंत्री व उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांना निवेदन
गुहागर : कृषी विद्यापीठाचे कृषी पदवीचे अर्ज भरण्याचे काम सुरू झाले आहे. अर्ज भरत असताना सर्वर डाऊन असल्यामुळे तसेच अनेक तालुका ठिकाणी मोबाईल रेंज नसल्याने अर्ज करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. कृषी विद्यापीठांचे कॉलेजच्या प्रवेशाचे अर्ज नोंदणी ऑनलाइन सुलभ पद्धतीने सुलभ होण्याकरता त्वरित उपाययोजना करावी, अशा मागणीचे निवेदन भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी कृषिमंत्री दादा भुसे व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील अनेक मुले – मुली कृषी पदवीधर होण्याकरता अर्ज करत आहेत. ग्रामीण भागातील मुला-मुलींना रात्री-अपरात्री कम्प्युटर सेंटरवर जाऊन अर्ज भरणे संयुक्तिक होणार नाही. तर या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन कृषी विद्यापीठांचे व लॉ कॉलेजच्या प्रवेशाचे अर्ज नोंदणी ऑनलाइन सुलभतेने होण्याकरता त्वरित उपाययोजना करावी व प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष डॉ. नातू यांनी केले आहे.