गुहागर : कविवर्य विजयकुमार मिठे सार्वजनिक वाचनालय पालखेड बंधारा (नाशिक) यांचे २०१९ वर्षाचे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात कादंबरी या वाड्मय प्रकारात बहुचर्चित मराठी साहित्यात गाजलेली आत्तापर्यंत सहा पुरस्कार प्राप्त करणारी कादंबरी पिपिलिका मुक्तिधाम ही प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांची (खरे ढेरे भोसले महाविद्यालय गुहागर) प्रथम पुरस्कार विजेती 2019 ची सर्वोत्कृष्ठ कादंबरी ठरली आहे. त्यामुळे तिला साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे वाड्मय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण आॅक्टोबर 2021 मध्ये करण्यात येणार आहे.
The novel Pipilika Muktidham, which has won six awards in Marathi literature till now, is Professor Dr. Balasaheb Labade’s first award winning novel has become the best novel of 2019. She will be honored with Sahitya Samrat Annabhau Sathe Vadmay Award. The award ceremony will be held in October 2021.
विविध पुरस्कार विजेत्यांची नावे वाचनालयाचे अध्यक्ष योगेश गायकवाड, उपाध्यक्ष सुनील जगताप आणि सरचिटणीस माधवराव जाधव यांनी जाहीर केले आहेत. याच नावाचा पुरस्कार यापुर्वी जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठाने जाहीर केला आहे. या कादंबरी विषयी विविध माध्यमातून जेष्ठ श्रेष्ठ समीक्षकांनी दखल घेतली आहे. मर्ढेकरांच्या मुंगीमुळे मराठी कवितेत जसा बदल झाला. असाच बदल पिपिलिका मुक्तिधाम या कादंबरीमुळे मराठी कादंबरीत झाला. ही कादंबरी मराठी कादंबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील विस्फोटक कादंबरी आहे. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले पिपिलिका मुक्तिधाम ही कादंबरी मराठी कादंबरीतील बहुआवाजी, प्रयोगशील, मराठीतील महत्वाची दखलपाञ कादंबरी आहे. डॉ. दिलीप धोंडगे मराठी कादंबरीत दखल घ्यावी अशी ही आगळीेवेगळी कादंबरी आहे. यातील निवेदन, विरूपण, काव्यात्मकता, प्रयोगशीलता, वास्तवता, अतिवास्तवता, संज्ञाप्रवाह, शैलीआविष्कार, थक्क करणारे आहेत.
मराठी कादंबरीत नव्या आवाजाची ही कादंबरी आहे बाबाराव मुसळे ( दै. सकाळ ) मराठी कादंबरीतील पिपिलिका मुक्तिधम ही कादंबरी मनोविश्लेषणात्मक प्रवाहातील नव्या मानदंडाची कादंबरी आहे. प्रा. साईनाथ पाचारणे ( साधना साप्ताहिक) पिपिलिका मुक्तिधाम कथनाच्या अंगाने नव्या वळणावरची पुरूषोत्तम बोरकरांच्या मेड ईन इंडियाच्याही पुढची कादंबरी आहे. डॉ. किसन पाटील “पिपिलिका मुक्तिधाम” ही मराठीत पहिली अभिजात उत्तरआधुनिक मेटाफिक्शन म्हणून अढळ स्थान राहील अशी कादंबरी आहे. प्रा. डॉ. आनंद पाटील आंतरराष्ट्रीय तुलनात्मक अभ्यासक जागतिक कादंबरीर्याच्या रांगेतील प्रभावी जीवनचित्रण करणारी नव्या मेटाफरची कादंबरी पिपिलिका मुक्तिधाम आहे. रामेश्वर सोळुंखे (मसापपत्रिका) “पिपिलिका मुक्तिधाम” ही समकालाच्या अवकाशात सामान्यांच्या प्रश्नांना भिडणारी कादंबरी आहे. हे प्रश्न जसे स्थानिक आहेत. तसेच राजकीय सामाजिक आर्थिक पटलावरचे मांडणारी नवीन मूल्ये रूजवणारी अस्वस्थतेचे कोलाज असणारी कादंबरी आहे. दा. गो. काळे (सक्षम समीक्षा) पिपिलिका मुक्तिधाम ही परकाया प्रवेशाची एक अद्भुतिका वाटते. ज्यात चार मुंग्या जगण्याचा अर्थ शोधत आहेत. त्यासाठी वेगवेगळे देह धारण करीत आहेत. ही कादंबरी आत्मानुभूतीची अंतर्यात्रा आहे प्रतिक पुरी( प्रतिष्ठाण) “पिपिलिका मुक्तिधाम” ही मराठी कादंबरीच्या प्रवाहातील नव्या टप्प्यावरची एक आव्हाणात्मक कादंबरी आहे. धनाजी घोरपडे(अक्षर वाडमय) या निमित्ताने खरे ढेरे भोसले महाविद्यावयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. बाळासाहेब लबडे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.