गुहागर : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्यिक बांधिलकीचं अनोखं नातं जपणाऱ्या आई प्रतिष्ठान मालेगाव जि.नाशिक यांच्यावतीने प्रतिष्ठेचे वाड्मयीन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार-२०२० हा येथील खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या पिपलिका मुक्तीधाम या कादंबरीस जाहीर झाला आहे.
परीक्षक डॉ. संजय बोरूडे व सत्यजित पाटील यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे. पिपिलिका मुक्तीधाम या कादंबरीस लवकरच राज्यस्तरीय साहित्य संमेलनात रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल -श्रीफळ देऊन जेष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
या कादंबरीची दखल मराठी साहित्य जगताने घेतली आहे. तीला आत्तापर्यंत चार राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र टाईम व इतर नियतकालीकांनी दखल घेतली आहे. मराठी कादंबरीतील परीवर्तनाच्या टप्प्यावरील कादंबरी म्हणून सर्वांनी एकमुखाने गौरव केला आहे. तिच्यावर आधारीत चित्रपटाचे काम चालू झाले आहे. आकाशवाणीवर व इतर वाहिण्यांनी तिची दखल घेतली आहे. डाॅ. लबडे यांची १२ पुस्तके प्रकाशित असून यात कादंबरी, कवितासंग्रह, संपादन, समीक्षा, संशोधन यांचा समावेश आहे. तसेच नवीन तीन चित्रपटास त्यांची गाणी आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.