गुहागर : येथील शिक्षक आणि लेखक ईश्वर हलगरे यांच्या ‘आरसा’ या कादंबरीला नाशिक येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे. यापूर्वी या कादंबरीला लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीचा उत्कृष्ट कादंबरी लेखन आणि नायगाव (जि. नांदेड) येथील केवळबाई स्मृती कादंबरी पुरस्कार मिळालेले आहेत. नाशिक येथील अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा तिसरा पुरस्कार असून या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे आहे. पुरस्काराचे वितरण ऑक्टोबर 2021 मध्ये नाशिक येथील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे
Teacher and writer Ishwar Halgare's novel 'Arsa' has been declered The Sahityaratna Annabhau Sathe Award. This is Third Award. Before this Best Novel award got from Dr. Babasaheb Ambedkar Sahitya Akademi, Latur. Second from Kevalbai Smriti Novel Award from Naigaon (Dist. Nanded).
‘आरसा’ ही कादंबरी जुलै 2020 मध्ये प्रकाशित झालेले असून साहित्यवर्तुळात तिचे उत्तम स्वागत होत आहे. ईश्वर हलगरे हे गुहागर येथील नामांकित जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 येथे प्राथमिक शिक्षक असून विद्यार्थ्यांना साहित्याची आवड निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम राबवतात. कवी- विद्यार्थी संवाद या उपक्रमांतर्गत त्यांनी अभ्यासक्रमातील मान्यवर कवींचा विद्यार्थ्यांसोबत ऑनलाइन पद्धतीने थेट संवाद घडवलेला आहे. त्याचबरोबर विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्याचा ते प्रयत्न करतात. महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा गुहागरचे ते कार्यवाह असून साहित्य चळवळीत सक्रिय आहेत. यापूर्वी अनेक साहित्यिक मासिकातून त्यांचे ललित लेखन प्रकाशित झालेले आहे. या पुरस्काराबद्दल हलगरे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.