• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अंजनवेलमधील ग्रामस्थांचे उपोषण समाप्त

by Mayuresh Patnakar
March 31, 2023
in Guhagar
231 2
0
Anjanvel Gram Panchayat election

ग्रामपंचायत अंजनवेल

453
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पंचायत समितीची मध्यस्थी, तडजोडीचे मुद्दे ग्रामसभेत ठेवण्याचा सूचना

Guhagar News, ता. 31 : Anjanvel villagers hunger strike ends ग्रामपंचायत अंजनवेलने  मक्तेदाराकडून 2 स्कूलबस (School Bus) तत्काळ ताब्यात घ्यावा व शाळा व्यवस्थापन समितीकडे चालविण्यासाठी द्याव्यात. असा तोडगा गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी सूचवला. हा तोडगा आंदोलनकर्ते ग्रामस्थ, अंजनवेल ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि मक्तेदाराने मान्य केला. 29 मार्चच्या ग्रामसभेने या तडजोडीला मान्यता दिली. त्यामुळे अखेर अंजनवेल ग्रामस्थांनी 29 तारखेला सायंकाळी उपोषण मागे घेतले. Anjanvel villagers hunger strike ends

अंजनवेल गावातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद आदर्श आंतरराष्ट्रीय शाळेच्या (International School) मालकीच्या 3 स्कूलबस आहेत. या स्कूलबस तीन वर्षांच्या कराराने (3 Yers Contract) चालवण्यासाठी साई टूर ॲण्ड ट्रॅव्हल्स, मार्गताम्हाने यांना देण्यात आल्या होत्या. मात्र ग्रामपंचायत अंजनवेलने मक्त्याचे पैसे न दिल्याने मक्तेदाराने 1 जानेवारी 2023 पासून  स्कुलबस चालविणे बंद केले तसेच तीन्ही स्कुलबस आपल्या ताब्यात ठेवल्या. या स्कुलबसचे पैसे ग्रामपंचायत अंजनवेलने द्यावेत, स्कुलबस पुन्हा सुरु व्हाव्यात यासाठी माजी सरपंच यशवंत बाईत, आत्माराम मोरे, माजी उपसरपंच विजय मिशाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश पुंडलीक यांनी फेब्रुवारी 2023 पासून प्रयत्न केले. मात्र त्याला ग्रामपंचायत अंजनवेल आणि पंचायत समितीकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे 13 मार्च 2023 पासून ग्रामपंचायत अंजनवेल समोर ग्रामस्थांनी आंदोलन सुरु केले. 10 दिवस आंदोलन झाले तरी प्रशासन हालचाल करत नसल्याने ग्रामस्थांनी हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा 25 मार्चला दिला होता. Anjanvel villagers hunger strike ends.

Anjanvel villagers hunger strike for school bus
Anjanvel villagers hunger strike ends.

पंचायत समितीची मध्यस्थी

या इशाऱ्यानंतर 27 मार्चला सहाय्यक गटविकास अधिकारी केळसकर आणि विस्तार अधिकारी कांबळे यांनी ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. 28  मार्चला गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी अंजनवेल ग्रामपंचायतीचे सरपंच स्नेहल मोरे, उपसरपंच बाळकृष्ण सुर्वे, पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, मक्तेदार साई टूरचे मालक अजीत साळवी आणि माजी सरपंच यशवंत बाईत, माजी सरपंच आत्माराम मोरे, माजी उपसरपंच विजय धोंडू मिशाळ, शाळा व्यवस्थापन समिती उमेश पुंडलीक किल्लेदार, सुधीर सुभाष कडव, मंगेश महेंद्र बागकर, दत्ताराम पड्याळ, नवनाथ धाकटु कुरधुंडकर, जयराज भुवड, अनिल खडपेकर आदी आंदोलनकर्ते ग्रामस्थ यांच्याजवळ स्वतंत्रपणे चर्चा केली. Anjanvel villagers hunger strike ends. 

Anjanvel villagers hunger strike ends

या चर्चेनंतर गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी पुन्हा  अंजनवेल ग्रामपंचायतीचे सरपंच स्नेहल मोरे, उपसरपंच बाळकृष्ण सुर्वे, ग्रामविकास अधिकारी, मक्तेदार साई टूरचे मालक अजीत साळवी, माजी सरपंच यशवंत बाईत, माजी सरपंच आत्माराम मोरे, माजी उपसरपंच विजय धोंडू मिशाळ यांची संयुक्त बैठक घेतली.  यामध्ये  ग्रामपंचायतीने अजीत साळवी यांच्याकडून 2 स्कुलबस तत्काळ ताब्यात घेवून त्या शाळा व्यवस्थापन समितीच्या ताब्यात द्याव्यात. शाळा व्यवस्थापन समितीने या स्कुल बस चालवाव्यात. ग्रामपंचायतीने मक्तेदाराला भाड्यापोटी देणे असलेल्या रक्कमेचा हिशोब 15 दिवसांत करावा. देय रक्कम मक्तेदाराला किती महिन्यात देणार त्याचा कालावधी निश्चित करावा.  देय रक्कमेसाठी माजी सरपंच यशवंत बाईत आणि आत्माराम मोरे यांनी ग्रामपंचायत अंजनवेलबरोबर संयुक्तरित्या प्रयत्न करावे. असा तोडगा सर्वानुमते मान्य करण्यात आला. तडजोडीचे हे मुद्दे 29 मार्च च्या ग्रामसभेत ठेवून त्याला ग्रामसभेची मंजूरी घ्यावी. हे सर्व मुद्दे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, मक्तेदार आणि आंदोलनकर्ते यांनी मान्य केले. 29 मार्चला अंजनवेलच्या ग्रामसभेत तडजोडीच्या सर्व मुद्द्यांना ग्रामस्थांनी एकमताने मंजूरी दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन थांबवले.  Anjanvel villagers hunger strike ends.

Tags : Guhagar News, Marathi News, News in Guhagar, Guhagar, Top News, Local News, Latest News, Latest Marathi News, गुहागर न्यूज, मराठी बातम्या, स्थानिक बातम्या, ताज्या बातम्या, स्थानिक मराठी बातम्या,

Tags: Anjanvel villagers hunger strike endsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLocal NewsMarathi NewsNews in GuhagarSchool BusTop newsगुहागर न्यूजताज्या बातम्यामराठी बातम्यास्थानिक बातम्यास्थानिक मराठी बातम्या
Share181SendTweet113
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.