• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा

by Ganesh Dhanawade
September 15, 2020
in Old News
17 0
0
Oxygen Trans
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार निघणार अधिसूचना

मुंबई (मुख्यमंत्री सचिवालय – जनसंपर्क कक्ष) : – कोविड-19 उपचारात रुग्णांसाठी अत्यावश्यक अशा ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार या वाहनांना रुग्णवाहिकेसारखा दर्जा देण्याची अधिसूचना गृह विभागाने आज जारी केली आहे.
त्यामुळे आता वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या या  वाहनांवर सायरन असणार. तसेच या वाहनांची वाहतूक रोखता येणार नाही. 
कोविड-19 रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन वायूचा पुरवठा सहजपणे उपलब्ध व्हावा यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 (2005 चा.53) चे कलम 38 चे उप कलम (1) आणि उपकलम (2) मधील खंड (एल) आणि साथ रोग अधिनियम- 19871897 चा 3) चे कलम 2 अन्वये यासाठी या वाहनांना रुग्णवाहिका चा दर्जा देण्यात आला आहे. त्यानुसार आपत्ती काळात पुढील एक वर्षासाठी वैद्यकीय कारणास्तव वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजन वायूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहीका समकक्ष वाहन तसेच आपत्ती व्यवस्थापन कर्तव्यार्थ वाहन म्हणून समजण्यात येणार आहे. अशा वाहनांना केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 108 च्या उप नियम (7) तसेच नियम 119 च्या उप नियम (3) च्या तरतूदी लागू करण्यात येत आहे, असे गृह विभागाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

Tags: AmbulanceCMOCoronaCovid19GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in GuhagarOxygen Tansportटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.