गुहागर : आमदार भास्करशेठ जाधव (MLA Bhaskar Jadhav) व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव (Zilla Parishad President Vikrant Jadhav) यांच्या मार्फत व आबलोली रुग्णकल्याण समितीच्या (Abloli Patient Welfare Committee) पाठपुराव्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला (Primary Health Centre) नवीन रुग्णवाहिका (new ambulance) उपलब्ध झाली आहे. याचा लोकार्पण सोहळा रुग्णकल्याण समितीच्या अध्यक्ष तथा वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या नेत्रा ठाकुर ( Z.P. Sadasya Netra Thakur) व पंचायत समितीच्या सभापती पूर्वी निमूणकर ( Panchyat Samiti Chairperson Purvi Nimunkar) यांच्या हस्ते पार पडला.
कोरोना काळात तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकेची नितांत गरज भासत होती. याच दरम्यान, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत जाधव विराजमान झाले. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयाना रुग्णवाहिका देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आबलोली रुग्णकल्याण समितीच्या अध्यक्ष नेत्रा ठाकूर यांनी आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या लोकार्पण सोहळ्याला वैद्यकीय अधिकारी डॉ. मुंढे, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत, माजी पंचायत समिती सभापती विलास वाघे, श्री. साळवी, श्री. पागडे, सरपंच कारेकर व आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.