सभापती पुर्वी निमुणकर यांचे प्रतिपादन
गुहागर : तालुक्यातील सर्वच शिक्षक बंधू- भगिनींनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याची भावना गुहागर पंचायत समितीच्या सभापती पूर्वी निमुणकर यांनी व्यक्त केली. त्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा गुहागरच्या वतीने आयोजित कुंभार समाज भवन पाटपन्हाळे येथे नवनियुक्त शिक्षण विस्तार अधिकारी, सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक व आदर्श शाळा यांचा सत्कार सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
Guhagar Panchayat Samiti Chairman Purvi Nimunkar expressed the feeling that all the teachers have nurtured social commitment along with quality education.At Kumbhar Samaj Bhavan Patpanhale organized by Maharashtra State Primary Teachers Committee Taluka Branch Guhagar Newly appointed education extension officers, retired teachers, ideal teachers and ideal schools She was speaking on the occasion of her felicitation ceremony.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सोहळ्यासाठी कोकण विभाग अध्यक्ष अंकुश गोफणे, जिल्हाध्यक्ष प्रकाश काजवे, तालुकाध्यक्ष अरविंद पालकर, शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद कासारे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी साधना कदम, सिध्दार्थ जाधव, धिरज गोळे, संतोष शेलार, संदिप कुंदे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी सर्व सत्कारमुर्तीचे प्रथमतः अभिनंदन केले बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रासमोर नवनवी आव्हाने उभी राहत असुन शिक्षण क्षेत्राला नव्या उंचीवर आणण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी शिक्षण क्षेत्राकडे जाणीवपुर्वक लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता, एन्.पी.एस. योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना लागू करणे, बदल्या व शिक्षक बंधु-भगिनींनीच्या अन्य जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत शिक्षक समिती नेहमीच आग्रही असल्याचेही त्यांनी त्यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने नवनियुक्त शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद कासारे, चिंतामणी गायकवाड, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. मनोज पाटील, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षिका ममता विचारे, आदर्श शिक्षक प्रभाकर कांबळे, आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त वेलदुर नवानगर, तळवली आगरवाडी, साखरी बुद्रुक, शिवणे नं २, माॅडेल स्कूल अंजनवेल, माॅडेल स्कूल साखरीआगर, शिक्षक समितीचे सेवानिवृत्त शिक्षक नेते, माजी चेअरमन, संचालक विश्वास बेलवलकर, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी साधना कदम, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सिद्धार्थ जाधव, शांताराम पोसकर, अंजली कलबुरमे, सेवानिवृत्त शिक्षक उपनेते संतोष धामणस्कर, पल्लवी बेलवलकर, मनोहर पवार, जनार्धन कटनाक, रवींद्र राऊत, विनायक काणेकर, श्रद्धा वळंजू, विश्वास पटवर्धन, मेघा कुलकर्णी, दीपक परडे, सुबोध मोहिते, प्रकाश मोहिते, गुरुनाथ जाक्कर, विजया मोरे, सुभाष घाडे, पांडुरंग सातपुते, प्रदीप शेंबेकर, चंद्रकांत पाते, शफिक चीमावकर, उदय वेल्हाळ, आमिना सहीबोले, आशा शिंगोटे, प्रज्ञा चव्हाण, स्मिता खरे, अवचित पांडे, मनोहर शिंदे, विनोदिनी घारापुरे, शंकर आग्रे, पल्लवी पटवर्धन, लक्ष्मण जोयशी, मौसपीस जुनेदी आदी सेवानिवृत्त शिक्षक बंधुभगिनींनीचा तसेच राज्यभरातील शिक्षकांना तंत्रस्नेही बनवण्यात मोलाचा वाटा असलेले प्रदिप पडवाळ यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता विचारे, नेहा जोगळेकर, विकास पाटील, नरेंद्र देवळेकर यांनी केले. तर आभार तालुका कोषाध्यक्ष दिपक जावरे यांनी मानले.