गुहागर : सातारा येथील अश्वमेध ग्रंथालयाच्या वतीने दिला जाणारा 2020 चा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार गुहागर तालुक्यातील जि. प. जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 चे शिक्षक आणि लेखक ईश्वर हलगरे यांच्या ‘आरसा’ या कादंबरीला प्रदान करण्यात आला आहे. (Akshar Gaurav Award to novel Aarasa)


सातारच्या नगर वाचनालयाच्या सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. रोख रक्कम, शाल, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. सदर पुरस्काराचे वितरण प्राचार्य पुरुषोत्तम शेठ यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिरीष चिटणीस, रवींद्र भारती झुटिंग, वाचनालयाचे अध्यक्ष शशिभूषण जाधव, दत्तात्रय मोहिते, संयोजक व संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र माने उपस्थित होते. ईश्वर हलगरे यांच्याबरोबर कार्यक्रमात डॉ. महेंद्र कदम, सुनीताराजे पवार, संजय ऐलवाड, कृष्णदेव गिरी, सतीश जाधव, शंतनु अभ्यंकर, शुभांगी दळवी व युवराज खरात यांना विविध साहित्य प्रकारासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. (Akshar Gaurav Award to novel Aarasa)
यापूर्वी आरसा कादंबरीला नाशिक येथील कविवर्य विजयकुमार मिठे सार्वजनिक वाचनालयाचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूरचा उत्कृष्ट कादंबरी लेखन पुरस्कार, नाथोबा दहिवाळ कादंबरी पुरस्कार, औरंगाबाद, कै केवळबाई मिरेवाड उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, नायगाव(बाजार) व एकता फाउंडेशन, शिरूर कासार (बीड) येथील साहित्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. (Akshar Gaurav Award to novel Aarasa)
‘आरसा’ या वेगळ्या आशय विषय घेऊन आलेल्या कादंबरीस अनेक पुरस्कार मिळत असल्याने हलगरे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. (Akshar Gaurav Award to novel Aarasa)