गुहागर : शांताराम चारीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व आयकर विभाग मुंबई येथे सेवा करीत असलेले मासू गावचे सुपुत्र राजेश शांताराम मासावकर, तुफानी रायडर्स क्रिकेट संघ मासू – मुंबई तसेच ग्रामस्थ यांच्या वतीने चिपळूण पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली.
Rajesh Shantaram Masavkar, son of Masu village, President of Shantaram Charitable Trust and serving in Income Tax Department, Mumbai, Tufani Riders Cricket Association, Masu – Mumbai as well as villagers provided a lot of help to the flood victims.
सुरूवातीलाच मदतीपासून वंचित असलेल्या चिपळूण शंकरवाडी या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू, धान्य, स्वच्छता साहित्य, चटया इत्यादी साहित्याचे मोठ्या प्रमाणात वाटप मासू गावातील चाकरमानी मंडळींनी मुंबई मधून येऊन प्रत्यक्ष केली. यावेळी शांताराम चारीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेश मासावकर, ग्रामपंचायत सदस्य विजय मसुरकर, माजी सरपंच पांडुरंग नाचरे, तुफानी रायडर्स क्रिकेट संघाचे उमेश आलिम, सुनील आलिम, अनिकेत नाचरे प्रणय नाचरे, प्रदीप आलिम, रोहित मोरे, संजय आलिम इत्यादी मंडळींनी प्रत्यक्ष जाऊन मदत कार्य केले.