गुहागर : गुहागर तालुका वकील संघटनेच्या(Guhagar taluka Lawyer Organization) सर्वसाधारण सभेमध्ये (General Assembly) गुहागर तालुक्यातील नामांकित विधिज्ञ ॲड. संकेत साळवी यांची सर्वानुमते संघटनेच्या अध्यक्षपदी(As president) बिनविरोध निवड(Selection) करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी ॲड. मयुर कानसे तसेच सचिव म्हणून ॲड सुशील अवेरे यांची निवड करण्यात आली.
संघटनेच्या सहसचिव ॲड. दिनेश विचारे, खजिनदार ॲड. पुनम पाटील, सह खजिनदार म्हणून ॲड. संजोग सावंत यांची निवड करण्यात आली आहे. 2008 साली गुहागर तालुक्यामध्ये सर्वप्रथम न्यायालयाची स्थापना (Establishment of court ) करण्यात आली. तेव्हापासूनच ॲड. संकेत साळवी यांनी गुहागर न्यायालयामध्ये आपल्या वकिली व्यवसायाची सुरुवात केली. अल्पावधीतच ॲड. साळवी यांनी त्यांच्या कायदेशीर कौशल्याच्या जोरावर गुहागर तालुक्यामध्ये नावलौकिक मिळवला. गुहागर न्यायालयाप्रमाणेच खेड येथील सत्र न्यायालय(Sessions Court) व चिपळूण येथील सत्र न्यायालयात देखील मोठ-मोठ्या गुन्ह्यांमध्ये आपले कौशल्य(Skills) पणाला लावून पक्षकारांना न्याय मिळवून दिलेला आहे.
वकिली व्यवसायाबरोबरच ॲड. संकेत साळवी हे विविध सामाजिक कार्यात(Social work) अग्रेसर आहेत. शिवतेज फाऊंडेशन(Shivtej Foundation) या त्यांच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून यापूर्वीच गुहागर तालुक्यातील गोपाळगड किल्ला(Gopalgad fort) हा राज्य शासनाच्या(State government) ताब्यात आणण्यासाठी त्यांनी संपूर्ण गुहागर तालुक्यात मोठी चळवळ उभी केली व त्यामध्ये त्यांना यश देखील प्राप्त झाले. आजही त्यांच्या शिवतेज फाऊंडेशन या सामाजिक संघटनेमार्फत(Social organization) गुहागर तालुक्यातील बंद असलेले निरामय हॉस्पिटल (Niramaya Hospital ) सुरू करण्यासाठी व्यापक स्वरूपात काम केले जात आहे. ॲड. साळवी यांची गुहागर तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.