गुहागर : तालुक्यातील वरवेली तेलीवाडी येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन आमदार भास्कर जाधव व जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत गावातील जेष्ठ नागरीक दिलीप महादेव विचारे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गावातील कार्यकर्त्यांनी सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
Bhumipujan of asphalting of road at Varveli Teliwadi MLA Bhaskar Jadhav and Zilla Parishad President Vikrant Jadhav In the presence of Dilip Mahadev Vichare, a senior citizen of the village.At this time, the village activists entered the shiv sena in public.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिवसैनिक विनायक मुळे, तालुकाप्रमुख सचिन बाईत, पंचायत समिती सभापती पूर्वी निमुणकर, उपसभापती सिताराम ठोंबरे, युवा सेना तालुका अधिकारी अमरदीप परचुरे, इम्रान घारे, सरपंच पुनम रावणंग, उपसरपंच धनश्री चांदोरकर, दिलीप विचारे, शिवसेना वाहतूक सेना तालुकाधिकारी प्रल्हाद विचारे, शाखा प्रमुख चंद्रशेखर विचारे, युवा कार्यकर्ता प्रशांत विचारे, ग्रा. प सदस्य दिव्या किर्वे, जगन्नाथ शिंदे, तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष अवेरे, मुंबई मंडळ अध्यक्ष पंढरी किर्वे, गाव अध्यक्ष दीपक किर्वे, बळीराम पवार, मधुकर किर्वे, संतोष किर्वे, महिला मंडळ अध्यक्ष रश्मी किर्वे, माजी सरपंच प्रतीक्षा किर्वे आदी उपस्थित होते.
भूमिपूजन कार्यक्रम पार पडल्यानंतर श्री काशीविश्वेश्वर मंदिर, वरवेली तेलीवाडी येथे उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी तरूण उत्साही मंडळ तेलीवाडीच्या वतीने आमदार भास्कर जाधव व जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांचा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी वरवेली तेलीवाडी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील १३० कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. सदरचा पक्षप्रवेश अंजनवेल जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केला. तेलीवाडीतील ग्रामस्थांची गेली कित्येक वर्ष तेलीवाडीत जाणाऱ्या पूर्ण रस्ता डांबरीकरण व्हावा अशी मागणी होती. यातील दोनशे मीटरचा रस्ता डांबरीकरण आ. जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी केला होता. परंतु तेलीवाडीतील पूर्ण रस्ता व्हावा अशी मागणी सतत ग्रामस्थांनी लावून धरली होती. अखेर ग्रामस्थांच्या मागणीला यश येऊन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली व आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत या पूर्ण रस्त्याचे भूमिपूजन पार पडले.
जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव आ. भास्कर जाधव यांनी वाडीच्या विकास कामाव्यतिरिक्त वाडीतील तरुणांना रोजगार तसेच महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी शासन स्तरावर लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई मंडळाचे अध्यक्ष पंढरी किर्वे यांनी केले. तर सूत्रसंचालन संतोष किर्वे यांनी केले. आभार गणेश किर्वे यांनी मानले.