परिवहनमंत्री अनिल परब : मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना दिलासा देणार
गुहागर, ता. 20 : महाराष्ट्रातील सर्व आगार सुरळीत सुरू झाल्यास निलबंन, सेवा समाप्तीच्या कारवाई मागे घेवू. फौजदारी कारवाई देखील कायदेशीर प्रक्रिया करुन मागे घेतली जाईल. असे प्रतिपादन परिवहनमंत्री अनिल परब यांनी (Transport Minister Anil Parab) आज माध्यमांसमोर केले. Action back if ST starts
अजयकुमार गुजर प्रणित महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेने परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर संपातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मुंबईत माध्यमांशी बोलताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, आज अजयकुमार गुजर यांच्यासोबत वेतनवाढीसह, विलिनीकरण, कारवाई आदी मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी विलिनीकरणासंदर्भात न्यायालयाच्या निर्देशांनुसार स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीचा जो अहवाल येईल तो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि राज्य सरकार मान्य करेल. कर्मचाऱ्यांनाही तो मान्य असेल. असे ठरले.
संबधित बातम्या : अहवाल संपकऱ्यांना अमान्य (20 डिसेंबरला काय घडले कोर्टात ते वाचा)
आर्थिक विषयांवर चर्चा करण्यास तयार
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे. अशी मागणी गुजर यांनी केली होती. आम्ही मुळ वेतनात वाढ करुन कर्मचाऱ्यांना चांगल्या स्तरावर नेवून ठेवले आहे. 10 तारखेच्या आत वेतन देण्याची हमी राज्य शासनाने घेतली आहे. त्यासाठी लागणारी आर्थिक मदतही राज्य शासन करणार आहे. तरीही आर्थिक विषयाबाबत चर्चा करायला आम्ही तयार आहोत. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मेडिक्लेम आणि विम्यासंदर्भातील मागण्यावर चर्चा केली जाईल असेही आश्र्वासन गुजर यांना दिले आहे. (Action back if ST starts)
संबंधित बातमी : काय आहे वेतनवाढीचा प्रस्ताव
कारवाई मागे घेणार Action back if ST starts
आंदोलनादरम्यानच्या कारवाईवरही चर्चा झाली. राज्यातील सर्व आगारातून एस. टी. कर्मचारी हजर झाले, एस.टी.ची सेवा पूर्ववत सुरु झाली की निलंबन आणि सेवा समाप्तीची कारवाई मागे घेतली जाईल. फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन कारवाई मागे घेतली जाईल. असे आश्र्वासन गुजर यांना दिले आहे. (Action back if ST starts)
मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना दिलासा देणार
आंदोलन कालावधी दरम्यान आत्महत्या केलेल्या तसेच मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे पोलीस अहवाल मागवले आहेत. ही सर्व प्रकरणे आम्ही तपासुन पाहु. त्यानंतर मृतांच्या वारसांना नोकरी मिळाली पाहिजे हा प्रस्ताव महामंडळाकडे ठेवला जाईल. आम्ही त्या कुटुंबांबाबत सकारात्मक विचार करु. असेही अजयकुमार गुजर यांना आश्र्वस्त केल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांना सांगितले. (Action back if ST starts)