ठेकेदाराकडून दुरुस्तीच्या ठिकाणी फलक लावण्यात दिरंगाई
गुहागर, ता. 27 : रामपूर येथे पहाटेच्या धुक्यात मुंबईतील पर्यटकाचे वाहनाला अपघात झाला. त्यानंतर ठेकेदाराने धावाधाव करत रस्त्याच्या दोन्ही बाजुंना पर्यायी रस्त्याचे फलक ठळकपणे लावले. गुहागर दरम्यान रस्त्यावरील कामाचे ठिकाणी फलक लावण्यात ठेकेदार दिरंगाई करत आहे. त्यामुळे अपघात झाल्यावरच ठेकेदार जागृत होतो. अशी चर्चा सध्या गुहागर, रामपूर परिसरात सुरु आहे. Accident on Highway
सध्या मनिषा कन्स्ट्रक्शनद्वारे रामपूर ते गुहागर या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. याच कामाचा भाग म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर येथे महामार्ग मोरी टाकण्यासाठी खोदण्यात आला आहे. बंद रस्त्याला शेतातून पर्यायी मार्ग काढण्यात आला आहे. हा पर्यायी मार्ग दाखविणारा प्रत्येकी एक छोटा फलक रस्त्याच्या दोन्ही बाजूना लावण्यात आला होता. मात्र त्यावर धुळ बसली आहे. 26 तारखेला रात्री मुंबईत एक पर्यटक गुहागरकडे येत होता. मात्र पहाटेच्या दाट धुक्यात धुळीने माखलेला पर्यायी रस्त्याचा फलक वाहकाला दिसला नाही. त्यामुळे वाहन थेट मातीच्या ढिगावर जावून आदळले. यामध्ये चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. Accident on Highway
या अपघातची माहिती कळताच मनिषा कन्स्ट्रक्शनने 27 तारखेला तातडीने याठिकाणी दोन मोठे फ्लेक्स लावले आहेत. मात्र रात्रीच्या वेळी हे मोठे फ्लेक्स धुक्यात दिसणार नाहीत. त्यामुळे वाहनाच्या प्रकाशावर चमकतील असे असे रेडियमचे दिशादर्शक लावावेत अशी मागणी रामपुरमधील ग्रामस्थांनी केली आहे. Accident on Highway
मोडकाआगर ते गुहागर दरम्यानही हा ठेकेदार महामार्गाचे काम करत आहे. या ठिकाणी देखील रोज बदल होतात. मात्र येथेही ठेकेदाराने कोणतेही फलक लावलेले नाहीत. आज खडी पसरण्यासाठी ठेकेदाराने रस्त्याच्या मध्यभागी लोखंडी शिगा ठोकल्या आहेत. या शिगा रात्रीच्या वेळी दिसाव्यात म्हणून रेडियम लावण्याची आवश्यकता आहे. मात्र जोपर्यंत अपघात होत नाही Accident on Highway तोपर्यंत हा ठेकेदार जागृत होत नाही अशी स्थिती आहे.


ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे झालेले अपघात (Accident on Highway)
नोव्हेंबर महिन्यात पाटपन्हाळे येथील नव्या पुलाजवळ डंपर आणि चारचाकीचा अपघात झाला. त्यानंतर ठेकेदाराने क्राँक्रिटचा रस्ता आणि पुल यातील अंतर कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी माती टाकली. पावसाळ्यात शृंगारतळी येथे दरड कोसळून रस्ता बंद झाला होता. तेथील दुरुस्ती एक एस.टी.ची गाडी रुतल्यावर ठेकेदाराने केली. सिमेंट रस्त्याला पडलेले खड्डे माध्यमांनी बातम्या दिल्यानंतर तातडीने भरण्यात आले.