क्रास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या गुहागर शाखेचे मुख्यमंत्र्याना निवेदन
गुहागर : क्रास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे गुहागर तालुका शाखेचेवतीने तहसिलदार यांच्या माध्यमातून पदोन्नती आरक्षणाचे संविधानीक न्याय मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्र्याना निवेदन सादर करण्यात आले.
The Guhagar taluka branch of the Kristribe Employees Federation submitted a memorandum to the state chief minister seeking constitutional justice for the promotion reservation through the tehsildar.
या निवेदनातील मागण्यानुसार राज्यशासनाने निर्णय घेवून शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचे पदोन्नती आरक्षण रद्द केले आहे. शासनाने पदोन्नतीच्या कोट्यातील पदे भरण्यासंदर्भात निर्णय घेऊन कोट्यातील तेहत्तीस टक्के पदे रिक्त ठेवली आहेत. केवळ खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे सेवा जेष्ठतेच्या नियमानुसार भरण्यास मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत. हा निर्णय पक्षपाती आहे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या अनुशेष भरतीबाबत व पदोन्नती आरक्षणाबाबत नकारात्मक दृष्टीकोन दिसून येत आहे. सरकारच्या या धोरणात्मक निर्णयामुळे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून याचा परिणाम सामाजिक स्तरावर होत आहे. आंदोलनाचा भाग म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले असून संविधानीक न्याय मागणी मान्य करण्यात यावी असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
तहसिल कार्यालयात निवेदन सादर करण्यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हा प्रतिनिधी सिद्धार्थ जाधव, प्राथमिक शिक्षक युनिटचे तालुका अध्यक्ष सुहास गायकवाड माध्यमिक शिक्षक युनिटचे तालुका अध्यक्ष सुधाकर कांबळे सचिव राजेश गायकवाड आदी उपस्थित होते.