गुहागर : तालुक्यातील गजबजलेली आणि परीसरातील सुमारे २५ गावांसाठी मध्यवर्ती असलेली आबलोली बाजारपेठ सोमवार दि.१७ मे २०२१ ते २३ मे २०२१ या कालावधीत पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटना, आबलोली यांच्या वतीने घेण्यात आला आहे.
A decision to close been taken by the trade association, Abloli, to keep the Abloli market, which is crowded in the taluka and central for about 25 villages in the area, completely closed from Monday 17th May 2021 to 23rd May 2021.
गेले काही दिवस तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक रितीने वाढत आहे.राज्यात १ जून पर्यंत लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी १७ ते २३ मे दरम्यान कडक लाॅकडाऊनचे आदेश दिले आहेत. त्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आबलोलीतील व्यापारी बांधवांनी फक्त औषधांची दुकाने वगळता बाजारपेठ पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
आबलोली बाजारपेठेत दवाखाना, बॅंक, पतसंस्था, पोस्ट, महावितरण, शाळा, महाविद्यालय आदी कामांसह बाजारहाट करण्यासाठी परीसरातील सुमारे २५ गावातील लोकांची ये-जा असते. योग्य पद्धतीने मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे आदींबाबत ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी सुचना देण्यात येत आहेत.रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून फक्त औषधांची दुकाने उघडी राहणार आहेत तसेच दुध, फळे, भाजी यांची गरजूंना मागणीनुसार पुरवठादारांनी घरपोच सेवा द्यावी असे ठरविण्यात आले. तसेच अनावश्यक खाजगी वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासन, व्यापारी संघटना, पोलीस पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी १७ मे ते २३ मे पर्यंत बाजारपेठ पुर्णतः बंद ठेवण्यात येणार असून त्यानंतर परीस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे. परीसरातील नागरिकांनी बाजारपेठेत येऊ नये. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सहकार्य करावे.
सचिन बाईत, अध्यक्ष- व्यापारी संघटना, आबलोली