शिवतेज फाऊंडेशनच्या चळवळीला यश – अॅड संकेत साळवी
गुहागर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत तालुक्यातील दुर्लक्षित आरोग्य सेवा पाहता गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेले निरामय हॉस्पिटल सुरु व्हावे,यासाठी शिवतेज फाऊंडेशनने सोशल मिडीयाच्या माध्यमातून एक चळवळ सुरु केली होती. याची दखल घेत राज्याचे तंत्र व शिक्षण मंत्री उदय सामंत व खा. विनायक राऊत यांनी नुकतीच निरामय रुग्णालयाला भेट दिली. त्यामुळे निरामय हॉस्पिटल सुरु होण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा आशावाद शिवतेज फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. संकेत साळवी यांनी व्यक्त केला आहे.
The Shivtej Foundation had started a movement through social media to reopen the Niramay Hospital, which had been closed for many years due to neglected health services in the taluka. Taking note of this, Uday Samant, Minister of State for Technology and Education Vinayak Raut recently visited Niramaya Hospital.
एक वर्षापूर्वी गुहागर वासियांची तातडीची वैद्यकीय गरज लक्षात घेऊन फार वर्षापूर्वी पासून बंद असलेले निरामय रुग्णालय सुरु करावे. यासाठी शिवतेज फाऊंडेशनने सोशल मिडीयाच्या माध्यमातून एक चळवळ सुरु केली होती. काही दिवसातच या चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आणि त्यावेळी देखील ना. सामत यांनी निरामय रुग्णालय सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मधल्या काळात फाऊंडेशन मार्फत केंद्रीय आरोग्य मंत्री, मा. पंतप्रधान, मा. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांना निरामय रुग्णालय सुरु करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. पंतप्रधान कार्यालय यांचेकडून निरामय रुग्णालयाच्या बाबतीत आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांना कळविण्यात आले होते. त्याची एक प्रत शिवतेज फाऊंडेशन यांना देखील माहितीसाठी देण्यात आली होती. त्यानंतर प्रशासकीय हालचाली होवून आज अखेर ना. सामंत, खा. राऊत, प्रांताधिकारी प्रवीण पवार व अन्य प्रशासकीय अधिकारी यांनी रुग्णालयाला भेट देऊन वर्षानुवर्षे बंद असलेली रुग्णालयाची इमारत उघडली. रुग्णालयाच्या इमारतीचे संपूर्ण सर्वेक्षण केल्यानंतर निरामय रुग्णालय सुरु केल्यास जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रावर असलेला ताण कमी होईल व परिसरातील नागरिकांना देखील वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल असे मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.
ना. सामत यांच्या भेटीने निरामय रुग्णालयात सुरु होण्याच्या दृष्टीने आश्वासक पाऊल पडले आहे. निरामय रुग्णालय लवकरात लवकर सुरु होऊन गुहागर वासियांना त्याचा लाभ घेता येईल, यांची आता खात्री वाटू लागले आहे. असे अॅड. साळवी म्हणाले.