• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

साखरीआगर येथे विहिरीत बिबट्या पडला

by Ganesh Dhanawade
September 6, 2021
in Old News
16 0
0
साखरीआगर येथे विहिरीत बिबट्या पडला
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी

गुहागर : शिकारीच्या मागावर आलेला बिबट्या (leopard) गुहागर तालुक्यातील साखरी आगर गावातील भरवस्तीत असलेल्या  विहिरीमध्ये पडल्याची घटना आज सकाळी घडली. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे (Forest department) कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्या पडल्याची वार्ता कळताच बिबट्याला पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
The incident took place this morning when a leopard fell into a well in the village of Sakhari Agar in Guhagar taluka. Forest department personnel rushed to the spot to catch the leopard The villagers of Panchkrushi had gathered to see the leopard as soon as they heard the news.

साखरी आगर येथील नंदकुमार नारायण झगडे यांच्या घराच्या मागे विहिर आहे. तसेच लगत जंगल परिसर असून सोमवारी सकाळी या विहिरीतील पाण्याचा पंप सुरू होत नसल्याने घरातील काहीजण सदरील पंप पाहण्यासाठी विहिरीवर आले होते. विहिरीत त्यांना डरकाळीचा आवाज आल्याने विहिरीत पाहिले असता विहिरीतील एका खडकाच्या भागांमध्ये भलामोठा बिबट्या बसल्याचे दिसून आले. बिबट्याला पाहताच आलेले भयभीत झाले. दरम्यान, झगडे यांनी आपल्या विहिरीत बिबट्या पडल्याची गुहागर वनविभाग यांना माहिती दिली. दुपारी 12 वाजता वन विभागाची टीम बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दाखल झाली. दुपारी चार वाजेपर्यंत बिबट्याला विहिरीतून काढण्यात यश आले.

बिबट्या बघण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केल्याचे दिसून येत होते. विहिरीत पडलेला बिबट्या हा शिकारीच्या नादात रात्रीच्या वेळी विहिरीत पडला असावा, असा तर्क वन विभागाने काढला आहे. तर भरवस्तीमध्ये बिबट्या आल्याने ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: Forest departmentGuhagarGuhagar NewsGuhagar TalukaLeopardMarathi NewsNews in Guhagarvillagewellटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजवन विभागशिकारी
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.