शिवतेज फाऊंडेशन तर्फे वीर पत्नींचा सन्मान
गुहागर : दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवान तसेच सीमेवर लढणार्या आणि कुटूंबापासुन दूर राहुन कर्तव्य बजावणार्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता आणि संवेदना व्यक्त करण्यासाठी प्रतीवर्षा प्रमाणे यावर्षीही शिवतेज फाऊंडेशन गुहागरच्या वतीने दिपावलीच्या प्रथम दिवशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी सोमवार सायंकाळी येथील श्रीदेव व्याडेश्वर मंदिरा समोरील तलावामध्ये “एक दिवा शहिदांसाठी” हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शिवतेज फाऊंडेशन व गुहागर वासीयांच्या वतीने भारत माता की जय.. च्या जयघोषात जवानांच्या वीर पत्नींचा तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या हस्ते भेटवस्तू आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
In the pond in front of Sridev Vyadeshwar Mandir, the project ” for Martyrs” was implemented. On behalf of Shivtej Foundation and Guhagar residents In the triumph of Bharat Mata Ki Jai .. of the heroic wives of the soldiers At the hands of Tehsildar Pratibha Warale was honored with gifts and honors.
गूहागरवासीय जवानांप्रती असलेली कृतज्ञता व संवेदना व्यक्त करण्यासाठी सर्व राजकीय व सामाजिक अभिनीवेश न बाळगता एकत्र येत असतात. ही बाब गुहागरवासीयांनी प्रत्येक वर्षी कृतीतून दाखवून दिली आहे. यावर्षी देखील मोठ्या संख्येने शिवतेज फॉऊंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत गुहागर वासीय उपस्थित होते. या उपक्रमातून शिवतेज फॉऊंडेशनने गुहागर वासीयांच्या मनामध्ये देश प्रेम आणि जवनांप्रति अभिमान जागृत ठेवण्याचे काम केले आहे. आज सीमेवरील जवनांमुळे आपण सुखाचे जीवन जगत आहोत. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या संस्थेने योग्य उपक्रम राबविले असल्याचे तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड. संकेत साळवी यांनी या उपक्रमाविषयी, तर नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर गिमवी येथील वीर पत्नी शकुंतला शिवराम तावडे व शुभांगी गंगाराम तावडे यांचा भेटवस्तू व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी भारत माता की जय.., वंदे मातरम…, जय जवान, जय किसान.., अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच याच गावातील रत्नप्रभा काशिराम कदम, निर्मलाबाई राजाराम तावडे, लक्ष्मी केरू लांजेकर यांचाहि दिवाळी मध्ये त्यांच्या घरी जाऊन शिवतेज फाऊंडेशच्या वतीने सन्मान केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम, नगरपंचायतीच्या बांधकाम सभापती वैशाली मालप, नगरसेविका स्नेहा भागडे, नगरसेवक अमोल गोयथळे, समीर घाणेकर, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा गुहागरचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर, संस्थेचे सचिव निलेश गोयथळे, प्रदीप बेंडल, विकास मालप, होमगार्ड तालुका समादेशक सुधाकर कांबळे, डॉ. मंदार आठवले, माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे, नगरपंचायतीचे माजी बांधकाम सभापती दीपक कनगुटकर, राकेश साखरकर, प्रताप शिर्के, श्रद्धा घाडे, सारिका कनगुटकर, सुप्रिया वाघधरे, शीतल साळवी, उमा बारटक्के, अर्चना बारटक्के, शामकांत खातू, निखिल तांबट, प्रभुनाथ देवळेकर, पराग मालप, संतोष वराडकर, अलंकार विकारे, अंकुश विखारे, ज्ञानेश्वर झगडे, स्वहंम सातर्डेकर, गुणेश दीक्षित, महेश्वर पाटणकर, आदींसह अन्य ग्रामस्थांनी तलावामध्ये पणत्या लावल्या. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवनश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष वरंडे यांनी केले.