गुहागर : तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रा. लि. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून असीम कुमार सामंता यांची नियुक्ती आज जाहीर झाली. यापूर्वी ते नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशनमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. पश्चिम बंगालमधील असीम कुमार सामंता यांनी कलकत्ता विश्र्वविद्यालयून मेकॅनिकल इंजिनियरींगमध्ये (बी.ई.) शिक्षण घेतले. 1983 मध्ये ते एनटीपीसीमध्ये नोकरीला लागले. गेल्या 37 वर्षांच्या कार्यकाळात असीम कुमार सांमता यांनी फरक्का, सिम्हाद्री, कोरबा, कहलगांव, कुडगी, सीपत या प्रकल्पामध्ये काम केले. सिम्हाद्री, कुडगी आणि सीपत येथील प्रकल्पाचे प्रमुख अशी जबाबदारी ही त्यांनी पार पाडली आहे. हायड्रो पॉवर आणि सौरउर्जा क्षेत्रातील अभ्यासक अशी ही त्यांची ओळख आहे. आरजीपीपीएल प्रकल्पात व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची आज नियुक्ती झाली. त्यापूर्वी ते मेजा उर्जा निगम प्रा. लि. या प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी संचालक होते.