गुहागर : भाजप नेते, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर भाजप व युवा मोर्चा आणि गुहागर तालुका मित्र परिवार यांच्या कडून चिपळूण मधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला आहे.
BJP leader, former MLA, district president Dr. Under the guidance of Vinay Natu, Guhagar BJP and Yuva Morcha and Guhagar Taluka Mitra Parivar have extended a helping hand to the flood victims in Chiplun.
स्वतः जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू चिपळूणात हजर राहून परिस्थिती वर लक्ष ठेवून यंत्रणा राबवत आहेत. तसेच जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा रत्नागिरी उत्तर श्री. संतोष जैतापकर हे मुंबईतुन स्थानिक कार्यकर्त्यांकडून परिस्थितीची माहिती करून घेत आहेत. शक्य ती मदत तातडीने देण्याची तयारी करत आहेत.
पूरग्रस्तांना प्राथमिक मदत म्हणून वेळणेश्वर व गुहागर मधून पाणी, कपडे, पुरीभाजी, धान्य तसेच वेळंब मधून बिस्कीट पुडे, पाणी, तवसाळ, कोतळूक मधून कपडे, तांदूळ, बिस्किटे, पाणी, मेणबत्ती असे साहित्य देण्यात आले. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष श्री. निलेश सुर्वे, सरचिटणीस गुहागर तालुका सचिन ओक, सोशल मीडिया जिल्हा संयोजक रत्नागिरी उत्तर शार्दूल भावे, युवा मोर्चा गुहागर शहर उपाध्यक्ष अमोल गोखले, ऋषिकेश गोखले, दिपक मोरे, कौस्तुभ गद्रे, मंदार गुहागरकर, उदय बागकर, गणेश बागकर, उल्हास आरेकर आदी हे पूरग्रस्त भागात मदत करत होते.
चिपळूणमध्ये अजून मदतीची गरज असून तेथील जनतेच्या आवश्यक मागणी नुसार मदत करण्याचे आश्वासन डॉ. विनय नातू यांनी दिले आहे. तसेच गुहागर तालुक्यातील जनतेला तालुकाध्यक्ष सुर्वे यांनी चिपळूण वासीयांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.