• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोरोना काळात रूग्णांना मदतीचा हात

by Ganesh Dhanawade
June 22, 2021
in Old News
16 1
0
कोरोना काळात रूग्णांना मदतीचा हात
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांचे योगदान                                

गुहागर : भाजपा ओबीसी मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या संतोष जैतापकर यांनी उभ्या केलेल्या वैद्यकीय टीमने कोरोना काळात अग्रेसर राहून दुसऱ्या लाटेत रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या सेवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
The medical team set up by Santosh Jaitapkar, Ratnagiri district president of the BJP OBC Morcha and a pioneer in social work, has been at the forefront of the Corona era and has given a helping hand to patients and their relatives in the second wave. Their service is appreciated from all levels.
रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे येथे राहणाऱ्या तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णाना लागणारे सर्व सहकार्य ही टीम चांगल्या प्रकारे करत आहे. या वैद्यकीय टीमचे प्रमुख मार्गदर्शक भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, शृंगारतळी येथील डॉ. राजेंद्र पवार हे प्रत्येक वेळी या सहकार्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत आहेत.
आता पर्यत ४०० पेक्षा जास्त रूग्णांना या टीमने सहकार्य केले आहे. या टीममध्ये मनोज डाफले, संदीप पिलणकर, श्री. गणेश पालकर, अनन्या गोणबरे, अंकिता कांबळे, संतोष निंबरे हे  काम करत आहेत. त्यांना गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी चांगले सहकार्य केले आहे. या टीममध्ये तालुक्यातील मुंबई, ठाणे, पालघर आणि गुहागर मधील २० डॉक्टर १०० परिचारिका आणि ८० इतर वैद्यकीय सेवेतील बांधव काम करत आहेत. या संपूर्ण वैद्यकीय टीमचे तालुक्यातील जनतेने कौतुक केले.
संतोष जैतापकर हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. एकीकडे जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कोरोना काळात जनतेकडे दुर्लक्ष करत असताना कोरोना काळात श्री. जैतापकर आणि गुहागर भाजपने अतिशय कौतुकास्पद काम केले आहे. मोफत धान्य वाटप, महत्वाच्या ठिकाणांचे निर्जंतुकिकरण तसेच कोरोना रुग्णांना व नातेवाईकांना लागेल ती मदत करण्यास आजही ही संपुर्ण टीम अग्रेसर आहे.

Tags: BJP OBC MorchaCoronaCorona In GuhagarCorona NewsCovid19GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarकोरोनाकोरोना बातम्याकोविड केअर सेंटरगुहागर तालुका भारतीय जनता पार्टीगुहागरातील कोरोनाटॉप न्युजताज्या बातम्याभाजपभाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षभाजपाभाजपा ओबीसी मोर्चाभाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षमराठी बातम्यालोकल न्युजवैद्यकीय अधिकारीवैद्यकीय विभाग
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.