पूरग्रस्तांना मदत करताना झालेल्या दुखापतीच्या शस्त्रक्रियेसाठी 1 लाखाचा चेक केला सुपूर्द
गुहागर : गुहागर तालुक्यातील विश्वनाथ पांडुरंग भुते (४३, रा. गणेशवाडी, साखरीआगर) हे चिपळूण येथील पूरस्थितीनंतर त्या भागातील आपदग्रस्तांच्या मदतीचे काम करण्याकरिता गेले असता त्यांना अपघात झाला होता. या अपघातात त्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. यानंतर श्री भुते यांच्यावर एसएमएस हॉस्पिटल चिपळूण येथे उपचार सुरू आहेत. उपचारासाठी शासनाने खर्च करावा अशी मागणी माजी आम. डॉ. विनय नातू यांनी केली होती. अनेकांनी मदतीचा हातही पुढे केला.मात्र अपघात मोठा असल्याने हा खर्च मोठा आहे. त्यामुळे याबाबाबतची माहिती मिळताच नाम फाउंडेशनने तब्बल 1 लाख रक्कमेचा चेक श्री भुते यांच्या उपचारासाठी सुपूर्द केला आहे.नाम फाउंडेशन कोकण विभागात गेली चार वर्षपासून जलसवर्धनाचे महत्वपूर्ण असे काम करत आहे,
Vishwanath Pandurang Bhute (43, resident of Ganeshwadi, Sakhariagar) in Guhagar taluka had met with an accident while he was on his way to help the disaster victims in Chiplun. He was seriously injured in the accident.


पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गेलेले श्री विश्वनाथ भुते हे चिपळूण येथील एसएमएस या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आहेत. त्यांच्या वैद्यकीय औषधोपचार शस्त्रक्रिया याकरता मोठ्या प्रमाणावर खर्च आजपर्यंत आला आहे. याकरिता नाम फाउंडेशनने पुढाकार घेत आपला मदतीचा हात दिला आहे. याकामी एसएमएस हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.परमेश्वर गौड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे, मुख्य समन्वयक गणेश थोरात, कोकण विभागीय समन्वयक समीर जानवळकर, गुहागर तालुका प्रतिनिधी हेमंत चव्हाण, चिपळूणचे नामचे सहकारी रमण डांगे, महेंद्र खेडेकर, महेंद्र कासेकर यांनी या कामी विशेष मोलाचे सहकार्य केले.