गुहागर : प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय सेवा केंद्र गुहागरचा ४ था वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने साजरा करतात आला. गेल्या चार वर्षात या सेवा केंद्राच्यावतीने अनेक सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रम राबविण्यात आल्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
वर्धापन दिनानिमित्त बंधू भगिनींनी सहज राज योगाचा अभ्यास करत संपूर्ण विश्वामध्ये कोरोना पीडितांसाठी सकारात्मक शक्तिशाली प्रकंपन पसरवले. त्यानंतर उमा बारटक्के व स्नेहा वरंडे यांनी वर्तमानमध्ये करत असलेल्या राजयोगाच्या अभ्यासाद्वारे झालेला स्व परिवर्तनाचा अनुभव कथन केला. गुहागर शाखा संचालिका शिल्पा बहनजींनी चार वर्षांचा अनुभव सांगितला. ब्रह्माकुमारी विद्यालय प्रत्येक मानवी जीवनामध्ये एक सकारात्मकतेचे कार्य करत आहे. चार वर्षांपूर्वी गुहागरमध्ये सकारात्मकतेचा वृक्षारोपण करण्यात आले होते. जे आज या रोपट्याचे वृक्षात रूपांतर झाले आहे. गुहागर तालुक्यामधील अनेक गावांमध्ये सकारात्मकतेच्या शाखा निर्माण होऊन अनेकांचे जीवन सशक्त व निरोगी व्हावे, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.
या कार्यक्रमाला गुहागर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश धनावडे, जीवनश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष वरंडे, सिद्धीविनायक जाधव, माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे, सुधाकर कांबळे, रवींद्र बावधनकर , मनोज बावधनकर, सुहास सातार्डेकर, मनाली बावधनकर, सोनल सातार्डेकर, दुर्गा बहन, सोहम सातार्डेकर, अरुण पाटील, महालक्ष्मी शिंदे, कामिनी बावधनकर, रवी बावधनकर आदी उपस्थित होते.