गुहागर : महाराष्ट्र छत्रपती युवा सेना गुहागर तालुका अध्यक्षपदी तालुक्यातील शृंगारतळी येथील सामाजिक कार्यकर्ते जुनेद म. इसाक तांबे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
जनतेच्या न्याय हक्कांसाठी छत्रपती युवा सेना संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. संघटनेची ध्येय – धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याचे काम केले जाते. तांबे यांनी लॉकडाऊन काळात सामाजिक बांधिलकी जपत सर्व समाजातील गरीब गरजूंना जीवनावश्यक वस्तू, अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करण्यात पुढे होते. कोणतेही काम पूर्णत्वास जाई पर्यंत त्यांचा पाठपुरावा असतो. त्यांच्या या कामाची दखल घेऊनच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रियाज ठाकूर यांनी नुकतीच शृंगारतळी येथील सामाजिक कार्यकर्ते जुनेद तांबे यांना गुहागर तालुका युवक अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र प्रदान केले. संघटनेच्या गाव तिथे शाखा, शाखा तिथे कार्यकर्ता या उपक्रमातून तालुक्यातील जनतेच्या संपर्क संपर्कात राहून त्यांच्या समस्या निवारणासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे जुनेद तांबे यांनी यावेळी सांगितले.