गुहागर : तालुक्यातील आबलोली येथील बाईत कुटुंबीयांनी येथील नागरिकांसाठी आपल्या नव्याने सुरू केलेल्या बी मार्ट मध्ये एकाच छताखाली किराणा मालाच्या सर्व किरकोळ व घाऊक वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता आपल्या पसंतीप्रमाणे वस्तू खरेदी करता येणार आहेत. बाईत यांच्या बी मार्टला पहिल्या दिवसापासूनच ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मे. चंद्रकांत ट्रेडिंग कंपनी सन १९८२ पासून गेली ३८ वर्ष किराणा रिटेल व होलसेल व्यवसाय अतिशय प्रामाणिकपणे करत आली आहे. ग्राहकांसाठी चांगल्या सेवा – सुविधा देण्याचा कायम प्रयत्न केला आहे. ग्राहकांची आवश्यकता व मागणी ओळखून चंद्रकांत ट्रेडिंग कंपनीचे सुपर मार्केट स्वतंत्र जागेमध्ये सुरू करण्यात आले आहे. ही संकल्पना चंद्रकला उद्योग समूहाचे प्रमुख चंद्रकांत धोंडू बाईत यांच्या मागणीनुसार युवा उद्योजक शुभम सचिन बाईत व राजत सचिन बाईत यांनी मोठ्या मेहनतीने नव्या स्वरूपात ग्राहकांसमोर आणली आहे. बाईत कुटुंबाची ही चौथी पिढी व्यवसायात उतरली आहे.
बी मार्ट मध्ये एकाच छताखाली सर्व प्रकारच्या ३ हजार पेक्षा जास्त वस्तू उपलब्ध करण्यात आल्या आहेत. स्वच्छ माल, उत्कृष्ट पॅकिंगमध्ये उपलब्ध, उत्पादकाकडून थेट घाऊक खरेदी केल्यामुळे मध्ये कोणतेच टप्पे नसल्याने त्याचा ग्राहकाला फायदा होणार आहे. ग्राहकालाही आपल्या पसंतीप्रमाणे वस्तू खरेदी करण्याचे समाधान आमच्या बी मार्ट मधून नक्कीच मिळेल, असे उद्योजक सचिन बाईत यांनी सांगितले.