भारतीय आजी माजी कर्णधारांचे स्थान घसरले
गुहागर, ता. 02 : आंतरराष्ट्रीय क्रिक्रेट मंडळाच्या (International Cricket Council, ICC) T20 क्रमवारीत (ICC T20 Ranking) भारत (India) प्रथम स्थानावर आहे. मात्र भारतीय संघापैकी एकही खेळाडू पहिल्या 10 मध्ये नाही. सलग दोन T20 मालिका जिंकूनही माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचे स्थान T20 क्रमवारीत घसरले आहे. हे दोन्ही खेळाडू टॉप टेन क्रमवारीतून बाहेर पडले आहेत. मात्र श्रीलंकेबरोबरच्या T20 मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्याने श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) 27 व्या क्रमांकावरुन 18 व्या क्रमांकावर आला आहे.


ICC T20 Ranking मध्ये देशांच्या क्रमवारीत भारत 270 गुणांनी प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंड (269), तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान (266), चौथ्या स्थानावर न्युझीलंड (255) आणि पाचव्या स्थानावर दक्षिण आफ्रिका (253) आहे. ICC Test Ranking कसोटी संघांच्या गुणवत्ता यादीत भारत 116 गुण मिळवत दुसऱ्या स्थानावर आहे. ICC ODI Ranking एकदिवस संघांच्या गुणवत्ता यादीत चौथ्या स्थानावर आहे.


ICC T20 Batting Ranking मध्ये Top10 मध्ये भारताचा केवळ एकमात्र खेळाडू लोकेश राहुल 10 व्या स्थानावर आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) 11 व्या स्थानावरुन 13 व्या स्थानावर घसरण झाली आहे. तर माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 15 स्थानावर आहे. श्रीलंकेविरुध्दच्या T20 च्या तीन सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी करताना श्रेयस अय्यर ने 174 च्या स्ट्राईक रेटने तब्बल 204 धावा केल्या होत्या. त्याचा श्रेयसला फायदा झाला आहे. या मालिकेपूर्वी तो 27 व्या क्रमांकावर होता. 8 गुणांची झेप घेत श्रेयस अय्यर 18 व्या स्थानावर आला आहे.
कसोटी क्रमवारीत (ICC Test Batting Ranking) रोहित शर्मा (Rohit Sharma) 6 व्या व विराट कोहली (Virat Kohli) 7 व्या स्थानावर आहे. तर एकदिवसीय क्रमवारीत (ICC ODI Batting Ranking) विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या आणि रोहीत शर्मा (Rohit Sharma) तिसऱ्या स्थानावर आहेत.


ICC T20 Bowlling Ranking मध्ये Top10 मध्ये भारताचा एकही खेळाडू नाही. कसोटी क्रमवारीत (ICC Test Bowlling Ranking) भारताचा रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) दुसऱ्या स्थानावर तर जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah) दहाव्या स्थानावर आहे. तर एकदिवसीय क्रमवारीत (ICC ODI Bowlling Ranking) जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah) सहाव्या स्थानावर आहेत.


ICC T20 All Rounder Ranking मध्ये पहिल्या 20 खेळाडूंमध्ये भारताचा एकही खेळाडू नाही. कसोटी अष्टपैलु खेळाडू क्रमवारीत (ICC Test All Rounder Ranking) मध्ये भारताचा रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) दुसऱ्या स्थानावर तर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) तिसऱ्या स्थानावर आहे. तर एकदिवसीय अष्टपैलु खेळाडू क्रमवारीत (ICC ODI All Rounder Ranking) रवींद्र जडेजा (9) या एकमात्र भारतीय खेळाडूला स्थान मिळाले आहे.
आयसीसी ने जाहीर केलेली Ranking पहाण्यासाठी खालील लाल रंगाच्या शब्दांवर क्लिक करा.
ICC Ranking