पर्यटन संचालनालय कोकण विभागतर्फे पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण
नवी मुंबई, दि. 25 : पर्यटन क्षेत्रात तरुणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय, कोकण विभागाच्यावतीने दि.21 मार्च ते १ एप्रिल २०२२ या कालावधीत पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण आयोजित केले आहे. Tourist Guide Training Program for Konkan Division

स्थानिक प्रसिध्द पर्यटनस्थळी पर्यटकांसाठी टूर गाईडची व्यवस्था करून या माध्यमातून युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या दुहेरी हेतूने कोकण विभागातील ६ पर्यटनस्थळी पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे राबविण्यात येणार आहे. यामध्ये पर्यटनस्थळ मुरबाड, हॉटेल सारीका, कल्याण माळशेज रोड, एसटी स्टँड जवळ ता. मुरबाड जि. ठाणे दि. २१ ते २५ फेब्रुवारी, अलिबाग, जि.प मराठी शाळा, ग्राम पंचायत कार्यालयासमोर, वर्सोली ता.अलिबाग जि.रायगड दि. २८ फेब्रुवारी ते ४ मार्च, मुरुड-श्रीवर्धन, माळी समाज हॉल, दाबके पाखाडी रोड, हायस्कूलच्या पुढे, श्रीवर्धन ता.श्रीवर्धन जि.रायगड दि. ७ ते ११ मार्च, रत्नागिरी हॉटेल सी फॅन्स, मांडवी बीच, गेट वे ऑफ रत्नागिरी जवळ, रत्नागिरी जि.रत्नागिरी दि. १४ ते १८ मार्च, सिंधुदूर्ग, एम.टी.डी.सी. हेड ऑफीस, ओरस, जि.सिंधुदूर्ग दि. २१ ते २५ मार्च, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई दि. २८ मार्च ते ४ एप्रिल या ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. Tourist Guide Training Program for Konkan Division

पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत (HTTM) इंडीयन इन्स्टिटयुट ऑफ टुरिझम व ट्रॅव्हल मॅनेजमेंट ग्वालियर तसेच पर्यटन संचालनालयातील तज्ञ व्यक्ती प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतील. या प्रशिक्षणात स्थानिक तरुणांना प्राधान्य मिळणार आहे. ज्यात मुख्यत: स्थानिक पर्यटनाची माहिती, नियम व सुरक्षा उपाययोजना पाळून पर्यटकांचा अनुभव परिपूर्ण कसा करावा तसेच पर्यटकांशी संवाद साधतांना आपल्याकडील माहिती गोष्टीरुपाने कशी मांडावी याविषयी सविस्तर प्रशिक्षण दिले जाईल. Tourist Guide Training Program for Konkan Division

यासाठी पर्यटनस्थळांच्या ठिकाणी हे तज्ञ प्रात्याक्षिक मार्गदर्शन करतील. पाच दिवसांच्या या प्रशिक्षणासाठी आधी चार दिवस निश्चित केलेल्या पर्यटन स्थळावर तसेच एक दिवस प्रत्यक्ष पर्यटनस्थळावर जाऊन प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थींना पर्यटन संचालनालयातर्फे प्रमाणपत्र/प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल. Tourist Guide Training Program for Konkan Division
त्याचप्रमाणे पर्यटन संचालनालयाकडून प्रशिक्षण कालावधीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना ओळखपत्र देण्यात येणार असून सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा तसेच कॅप आणि मास्क सुध्दा दिले जाईल. या प्रशिक्षणाचा खर्च पर्यटन संचालनालयाकडून करण्यात येत असून हे पाच दिवसाचे प्रशिक्षण नि:शुल्क दिले जाईल, अशी माहिती पर्यटन विभागाचे उपसंचालक श्री.हनुमंत हेडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे. Tourist Guide Training Program for Konkan Division

