राजेश धनावडे, जांगळेवाडी शाळेत शिवजयंती साजरी
गुहागर, दि 25 : अखिल जांगळेवाडी यांच्यावतीने जिल्हा परिषद मराठी शाळा जांगळेवाडी येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. Shivaji Maharaj is a dutiful administrator

प्रथम दीपप्रज्वलन करून महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून अखिल जांगळेवाडीचे कार्यक्रम प्रमुख प्रसाद जांगळी यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. छ. शिवाजीराजांचे विचार आणि त्यांचे कर्तृत्व आजच्या तरुणांनाही आदर्शवत असे असून आजच्या जगाला महाराजांचे विचार गरजेचे आहेत. आपण सर्वजण महाराजांच्या विचारांवर वाटचाल करूया असे आवाहन केले. Shivaji Maharaj is a dutiful administrator

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विचारदिन म्हणून साजरी केली जावी. राजांनी रयतेचे राज्य निर्माण करून बलाढ्य आरमार उभे केले. सागरी शत्रूंना दहशत बसवली. त्यांच्या राज्यात न्याय, समता, बंधुता होती. गुणवत्तेला कौतुकाची थाप मिळत होती. त्यांची प्रशासकीय व्यवस्था आजही आदर्शवत मानली जाते. महाराजांसारखा शुद्ध चारित्र्याचा, पराक्रमी, धाडसी, समयसुचक, कर्तव्यदक्ष, नियोजनशील प्रशासक शोधूनही सापडणार नाही. विद्यार्थ्यांनी त्यांची जयंती केवळ उत्सव म्हणून न पाहता विचार दिन म्हणून पाहावे, असे प्रतिपादन गुहागर पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल राजेश धनावडे यांनी केले. Shivaji Maharaj is a dutiful administrator

श्री. धनावडे यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात करियर निवडताना व त्या वाटेवर चालताना छ. शिवाजी महाराजांचा आदर्श सर्वांसमोर ठेवला. महाराजांनी लहान वयात केलेली कामगिरी हीच आपल्यासाठी प्रेरणादायी ठरते. कितीही कठीण परिस्थिती आली तरी आपले ध्येय गाठण्यासाठी परिश्रम घेण्याची तयारी असली पाहिजे. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा उपयोग आपल्या शैक्षणिक कामासाठीच करावा. त्याचा दुरुपयोग करू नये, असे आवाहन केले. Shivaji Maharaj is a dutiful administrator
या कार्यक्रमाचे व्याख्याते शिक्षक ईश्वर हलगरे यांनी महापुरुषांचे दैवतीकरण सुरू झाले की त्यांच्या विचारांची चिकित्सा बंद होते. आणि उत्सवी; किंबहुना धार्मिक रूप प्राप्त होतं. महापुरुषांना दैवत्व बहाल करून त्यांच्या विचारकार्याला मूठमाती देत हवा तसा उत्सव साजरा केला जातो. शिवाजी महाराज एक माणूस होते आणि माणसाला असणाऱ्या सर्व मर्यादा त्यांना होत्या. त्यांच्या पुऱ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जे अलौकिक कार्य केलं त्याला मात्र तोड नाही. या कार्याची प्रेरणा मांसाहेब जिजाऊ होत्या. Shivaji Maharaj is a dutiful administrator
शिवरायांचे जीवनचरित्र तटस्थ व विवेकबुद्धीने अभ्यासण्याचा विषय आहे. त्यासाठी प्रत्येकाने सत्य आणि प्रमाणित पुराव्याचा आधार घेतला पाहिजे. त्यांच्या चरित्राच्या बाबतीत अनेक विसंवादी घटना व प्रसंग मुद्दाम पसरवले जातात. विध्यार्थ्यांनी चिकित्सक अभ्यास करून आपला विचारव्ह्यू निश्चित केला पाहिजे. Shivaji Maharaj is a dutiful administrator
महापुरुषांना दैवत्व प्राप्त करून हवं तसं त्याचा उत्सव साजरा केला जातो. आज शिवाजी महाराजांना दैवत देण्यापेक्षा त्यांचे विचार आणि कार्य अभ्यासून चिंतन करणे अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. Shivaji Maharaj is a dutiful administrator
वेलदुर नवानगर शाळेचे मुख्याध्यापक डॉ. मनोज पाटील यांनी छत्रपती शिवराय धाडस, चातुर्य, कर्तृत्व, संघटन कौशल्य, शेतीतज्ञ अर्थतज्ञ, दूरदृष्टी, शासन-प्रशासन, कर्तव्यकठोरता, न्यायबुद्धी अशा कोणत्याही कसोट्यांवर घासून पाहिलं तर छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्व उजळून निघते. श्री. पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील एकदोन दाखल्यासह विद्यार्थ्यांना त्यांच्या विचार कार्याचे महत्त्व पटवून दिले. Shivaji Maharaj is a dutiful administrator
या कार्यक्रमासाठी स्वीकृत नगरसेवक विकास मालप, संजय मालप, नगरसेविका स्नेहल रेवाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिता धनावडे, आशा सेविका दीक्षा माटल, मुख्याध्यापिका सौ. आठवले, सुधीर जांगळी, गणपत जांगळी, सुभाष घाडे, नामदेव रामाणे, विजय देवाळे, राज विखारे, राजेश पाष्ठे, सागर धनावडे आदी उपस्थित होते. Shivaji Maharaj is a dutiful administrator

