• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे ग्रामपंचायत करणार कोविड योद्धांचा सन्मान

by Ganesh Dhanawade
September 26, 2020
in Old News
16 1
0
पाटपन्हाळे ग्रामपंचायत करणार कोविड योद्धांचा सन्मान
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीतर्फे तालुक्यात कोरोना संक्रमणाच्या काळात सामाजिक भावनेतून कामगिरी बजावणारे, तालुक्यातील डॉक्टर्स,  परिचारिका, पोलीस, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, पत्रकार, आशाताई, तालुक्याचे अधिकारी, व्यापारी आदींचा कोविड योद्धा म्हणून बुधवार दि. ३० सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११ वा. ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सन्मानाचे आयोजन केले आहे. 
राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतींना आवाहन करून रोख रक्कम रक्कम देण्याचे जाहीर केले होते. या स्पर्धेमध्ये गुहागर तालुक्‍यात पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक प्राप्त केला. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीतर्फे विविध सामाजिक उपक्रम नेहमीच राबवले जातात. कोरोना काळात ग्रामपंचायतीने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम राबविले होते. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या काळात सामाजिक भावनेतून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढाकार घेणार्‍या लोकांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान केला जाणार असल्याचे सरपंच संजय पवार यांनी सांगितले.  ग्रामपंचायतीतर्फे प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन ग्रामपंचायतीच्यावतीने गौरव केला जाणार आहे.

Tags: CoronaCovid19Grampanchayat PatapnhaleGuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarकोरोनाग्रामपंचायत पाटपन्हाळेटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.