• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खरे ढेरे भोसले कॉलेजला रजिमसचे साह्य

by Mayuresh Patnakar
January 31, 2022
in Guhagar
17 0
0
RDCC Bank helps KDB College

RDCC Bank helps KDB College

33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जयवंत जालगावकर : हवामान बदलावर चर्चासत्र आवश्यक

गुहागर, ता. 29 : सातत्याने बदलणारे हवामान आणि त्याचे परिणाम (Socio-economic and environmental effects of climate change in the Indian subcontinent) याबाबत देशपातळीवर चर्चा होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने खरे ढेरे भोसले महाविद्यालयाने राष्ट्रीय चर्चासत्राचा चांगला उपक्रम हाती घेतला आहे.  या उपक्रमाला मदत म्हणून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने  50 हजार रुपयांचे आर्थिक साह्य केले आहे. अशी माहिती बँकेचे संचालक जयवंत जालगांवकर यांनी दिली. RDCC Bank helps KDB College

RDCC Bank helps KDB College

खरे ढेरे भोसले महाविद्यालयाद्वारे ‘भारतीय उपखंडातील हवामान बदलाचे सामाजिक आर्थिक व पर्यावरणीय परिणाम’ (Socio-economic and environmental effects of climate change in the Indian subcontinent) या विषयावर राष्ट्रीय परिषद भरविण्यात येणार आहे. या परिषदेसाठी देशभरातील विविध पर्यावरण तज्ञ, अर्थतज्ञ, कृषीतज्ञ (Environmentalists, economists, agriculturists) यांच्याशी महाविद्यालयाची बोलणी सुरु आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी देशभरातील या विषयाचे अभ्यासक, जाणकार तसेच मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये यांच्याशी संपर्क साधण्याचे काम सुरु आहे. एवढ्या मोठ्या कार्यकक्षेत्रामध्ये आणि शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होण्याऱ्या  राष्ट्रीय चर्चासत्रासाठी तंत्रज्ञानाची जोड ही आवश्यक आहे. त्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी परवाने घेणे गरजेचे ठरते. या सर्व गोष्टीसाठी महाविद्यालयाला निधीची गरज होती. विषयाचे महत्त्व लक्षात घेवून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने महाविद्यालयाचा प्रस्ताव स्विकारला. बँकेचे संचालक जयवंत जालगांवकर आणि डॉ. अनिल जोशी यांनी महाविद्यालयाला रु. 50 हजाराचा धनादेश दिला आहे. त्याबद्दल रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्राचार्य सावंत यांनी आभार मानले आहेत. RDCC Bank helps KDB College

Tags: Breaking NewsGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLocal NewsMarathi NewsNews in GuhagarRDCC Bank helps KDB CollegeTop newsगुहागर न्यूजगुहागरच्या बातम्याताज्या बातम्यामराठी बातम्यास्थानिक बातम्या
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.