• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

हुतात्मा दिनी मौन पाळण्याचे निर्देश

by Mayuresh Patnakar
January 29, 2022
in Bharat
16 0
0
Hutatma Din

Hutatma Din

32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई, दि. 29 : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दि. ३० जानेवारी रोजी दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. त्यानुसार यावर्षीही रविवार दिनांक ३० जानेवारी, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात यावा, असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे. (Hutatma Din)

रविवार, दि. ३० जानेवारी, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता पाळण्यात येणाऱ्या मौन (स्तब्धता) ची सुरुवात होण्यापूर्वी सकाळी १०.५९ पासून ११.०० वाजेपर्यन्त इशारा भोंगा वाजविण्यात येईल. हा इशारा भोंगा संपल्यानंतर सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/आस्थापना/शैक्षणिक संस्था/ विद्यापीठे यामधील अधिकारी / कर्मचारी / शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी,  विद्यार्थी तसेच नागरिक आदी सर्वांनी दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळावे. सकाळी ११.०२ मिनिटांनी मौन (स्तब्धता) संपल्यासंबंधीचा इशारा भोंगा सकाळी ११.०३ मिनिटांपर्यंत वाजविण्यात येईल. जेथे भोंग्याची व्यवस्था नसेल तेथे वरीलप्रमाणे सकाळी ११.०० वाजता मौन (स्तब्धता) पाळण्याबाबत योग्य ते निर्देश संबंधितांना देण्यात यावेत.  हुतात्म्यांना आदरांजली गंभीरपणे व योग्य त्या आदराने मौन (स्तब्धता) पाळून देण्यात येईल. याची दक्षता घेण्यात यावी.असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे. (Hutatma Din)

Tags: Breaking NewsGuhagar NewsHutatma DinLatest Marathi NewsLatest NewsLocal NewsMarathi NewsNews in GuhagarTop newsगुहागर न्यूजगुहागरच्या बातम्याताज्या बातम्यामराठी बातम्यास्थानिक बातम्या
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.