• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अवघड वळणांवर बसवले बर्हिगोल आरसे

by Mayuresh Patnakar
January 25, 2022
in Guhagar
16 0
0
The tradition of non-opposition in Kotaluk is broken

The tradition of non-opposition in Kotaluk is broken

32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अपघात टळणार, सार्वजनिक बांधकामाचा नवा प्रयोग

गुहागर, ता. 25 : Mirrors Mounted on Turns शृंगारतळी आबलोली मार्ग पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या मार्गावर अनेक तीव्र, अवघड वळणांवर अपघात होतात. हे अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) प्रायोगिक तत्त्वावर दोन ठिकाणी मोठे बर्हिगोल आरसे बसवले आहेत. अशाप्रकारचे कॉर्नर आरसे अवघड वळणावर बसवून अपघातापासून संरक्षण करण्याची मागणी  भाजप सरचिटणीस सचिन ओक यांनी बांधकाम विभागाकडे केली होती. Mirrors Mounted on Turns

श्रृंगारतळी आबलोली मार्गावरील वेळंब, पांगारी तर्फे वेळंब, कोतळूक, शीर या गावात अवघड आणि तीव्र वळणे आहेत. समोरुन येणारे वाहन दिसत नाही. भातगाव राई पुलाला जोडणारा रस्ता असल्याने गुहागर ते रत्नागिरीसाठी हा जवळचा मार्ग आहे. स्वाभाविकपणे या रस्त्याचा वापर परिसरातील ग्रामस्थांसह पर्यटक, शासकीय अधिकारी कर्मचारी, माल वहातूक करणारी अवजड वाहने मोठ्या संख्येने करत असतात. त्यामुळे वळणांवर होणाऱ्या किरकोळ अपघातांची संख्याही वाढत आहे. हे लक्षात घेवून अवघड वळणांवर कॉर्नर आरसे Mirrors Mounted on Turnsबसवावे. अशी मागणी गुहागर तालुका भाजप सरचिटणीस सचिन ओक यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरच्या उपअभियंता निकम मॅडम यांच्याकडे केली.

Mirrors Mounted on Turns
Kotluk : Mirrors Mounted on Turns

आजपर्यंत गुहागरमध्ये असे आरसे सार्वजनिक रस्त्यावर कुठेच बसविलेले नाहीत. त्यामुळे निधी कसा उपलब्ध करायचा. त्या आरशांची सुरक्षितता कशी पहायची. असे अनेक प्रश्र्न होते. तरीदेखील प्रायोगिक तत्त्वावर  दोन तीन ठिकाणे आरसे बसवुया. असा निर्णय सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरचे उपअभियंता निकम यांनी घेतला. त्याप्रमाणे कोतळूक बोऱ्याफाटा आणि नाना ओक थांबा येथे दोन आरसे Mirrors Mounted on Turns बसविण्यात आले आहेत. या आरशांची चोरी होणार नाही, आरसे सुरक्षित रहातील. याची जबाबदारी तेथील ग्रामस्थांनी घ्यावी. अशी विनंती बांधकामने केली आहे. मागणी पूर्ण केल्याबद्दल भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस,कोतळूक ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक व ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला धन्यवाद दिले आहेत. Mirrors Mounted on Turns

अपघात टळल्यास आग्रह धरणार

बांधकाम विभागाने बसविलेल्या आरसांमुळे अपघात टळले, आरसे सुरक्षित राहीले तर ही सुविधा या मार्गावरील अन्य अवघड वळणांवरही उपलब्ध करुन द्यावी. अशी आग्रही मागणी आम्ही करणार आहोत.
– सचिन ओक, सरचिटणीस, भाजप गुहागर

Tags: Breaking NewsGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLocal NewsMarathi NewsMirrors Mounted on TurnsNews in GuhagarTop newsगुहागर न्यूजगुहागरच्या बातम्याताज्या बातम्यामराठी बातम्यास्थानिक बातम्या
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.