समीर काळे : संबंधितांना कायदेशीर नोटीस बजावणार
गुहागर, ता. 22 : येथील नगरपंचायतीने मोडकाआगर धरण परिसरात असलेल्या पंपहाऊस जवळ जनरेटरसाठी केबीन बांधली आहे. सदर बांधकाम करताना जागा मालक आणि लघु पाटबंधारे विभागाची घेतलेली नाही. (Without permission Construction by Nagarpanchayat)असे आरोप मँगो व्हिलेजचे मालक समीर काळे यांनी केले आहेत.
मोडकाआगर येथे धरणालगत गुहागर शहराला पाणीपुरवठा करणारी विहीर आणि पंप हाऊस गेली अनेक वर्ष आहे. ही जागा मँगो व्हिलेजचे मालक समीर काळे यांनी 2010 मध्ये खरेदी केली होती. लघु पाटबंधारेचा मोडकाआगर धरणाच्या भिंतीकडे जाणारा रस्ता, गुहागरला पाणी पुरवठा करणारी विहीर, पंपहाऊस हे सर्व समीर काळे यांच्या जागेत आहे. सदर रस्ता, जॅकवेल आणि पंपहाऊस या तीन गोष्टी गुहागर शहरातील जनतेसाठी आवश्यक असल्याने समीर काळे यांनी कधीही हरकत घेतली नव्हती. किंबहुना सदर पंपहाऊस आणि जॅकवेल ची जागा करार करुन गुहागर ग्रामपंचायत व नंतर नगरपंचायतीला देण्याबाबतच प्रस्ताव समीर काळे यांनी ठेवला होता. मात्र हा प्रस्ताव प्रशासनाने गांभिर्याने घेतला नाही. Without permission Construction by Nagarpanchayat
Without permission Construction by Nagarpanchayat
अनेक दिवसांनंतर शनिवारी 22 जानेवारीला काळे आपल्या जागेत फेरफटका मारण्यासाठी गेले असताना त्यांनी जनरेटर ठेवण्यासाठी केलेले बांधकाम पाहिले. जागा मालक म्हणून नगरपंचायतीने साधी विचारणाही केली नाही. त्यामुळे नगरपंचायतीला ते नोटीस बजावणार आहेत.
याबाबत समीर काळे म्हणाले की, गुहागर नगरपंचायतीच्या पाणी कमिटीने माझ्या मालकीच्या जागेत माझी कोणतीही परवानगी न घेतां अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम सुरू केलेले आहे. यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची विनंती मी मा. तहसीलदार, मा. प्रांत व मा. रत्नागिरी जिल्हाधिकारी यांचेकडे करणार आहे. Without permission Construction by Nagarpanchayat
या संदर्भात Guhagar News जवळगुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले की, गेली तीन वर्षात सातत्याने येणाऱ्या वादळामुळे वीजवाहिन्या तुटल्यावर शहराला पाणी पुरवठा करता येत नाही. दररोजच्या वीजेच्या खेळखंडोबामुळे पाणी वितरणाचे नियोजन कोलमडून पडते. शहरातील काही भागाला पाणी मिळत नाही. म्हणून स्वमालकीचा जनरेटर घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यासाठी पंपहाऊसजवळ पक्के बांधकाम केले आहे. व्यापक जनहिताकरीता निर्णय घेताना जागा मालकाला विचारणे आवश्यक होते. मात्र सदरच्या जागेत वर्षानुवर्षे पंपहाऊस व विहीर असल्याने या जागेच्या मालकीबाबत विचार केला गेला नाही. या विषयात आम्ही संवादातून मार्ग काढू. Without permission Construction by Nagarpanchayat