प्रा. डॉ. रामेश्वर सोळंके यांचे प्रतिपादन
गुहागर : येथील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व सदानंद सुदाम पाटील विज्ञान, श्री. महेश जनार्दन भोसले वाणिज्य व कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक डॉ. रामेश्वर सोळंके यांचे ‘spoken English open your door’ या विषयावर व्याख्यान(Lecture) संपन्न झाले. इंग्रजी या आंतरराष्ट्रीय भाषेचे(International language) रोजच्या जीवनातील महत्व तसेच या भाषेतून सहजरीत्या संभाषण(Conversation) कसे करावे याबाबत त्यांनी मार्गदर्शन(Guidance) केले.
सदर कार्यक्रम खरे- ढेरे- भोसले महाविद्यालयाच्या(Khare- Dhere- Bhosle College) सेमिनार हॉलमध्ये (Seminar Hall) संपन्न झाला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्रा. डॉ. अनिल सावंत, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. व्ही. पी. कोरके, प्रा. आर. पी. खोत, इंग्रजी विषयाचे प्रा. ए. एच. देशपांडे, प्रा. पी. एच. कटरे व कला, वाणिज्य शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ. सावंत यांनी इंग्रजी भाषेविषयी आजच्या काळात अद्ययावत राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे सांगितले. प्राध्यापक सोळंके यांनी विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा(English language) सहजरीत्या कशी अवगत करावी हे अनेक उदाहरणातून सांगितले. इंग्रजी भाषेचे महत्त्व सांगत असताना प्राध्यापक सोळंके यांनी भाषेची वैशिष्ट्ये विशद केली. इंग्रजी ही भाषा अत्यंत लवचिक असून काळाच्या ओघात तिची प्रगती झालेली आहे, हे उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन(Hosting) कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक देशपांडे यांनी तर आभार प्राध्यापक कटरे यांनी मानले.